Elec-widget

गंभीरची कारकिर्द मी उद्ध्वस्त केली, पाकिस्तानी क्रिकेटपटूचा दावा

गंभीरची कारकिर्द मी उद्ध्वस्त केली, पाकिस्तानी क्रिकेटपटूचा दावा

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरची कारकिर्द आपल्यामुळे संपुष्टात आल्याचा दावा पाकिस्तानी क्रिकेटपटूने केला आहे.

  • Share this:

कराची, 07 ऑक्टोबर : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानने भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या पाकिस्तानी संघातून बाहेर असलेल्या इरफानने म्हटलं की, मर्यादित षटकातील गंभीरची कारकिर्दी मी उद्ध्वस्त केली. मोहम्मद इरफान याआधी शेवटचा सामना 2016 मध्ये खेळला होता. तेव्हा पाकिस्तानने इंग्लविरुद्ध सामना खेळला होता. यात त्याने 5 षटकात 26 धावा देत 2 गडी बाद केले होते. यामध्ये त्याने इंग्लंडचे दोन्ही सलमीवीर जेसन रॉय आणि अॅलेक्स हेल्स यांना बाद केलं होतं.

मोहम्मद इरफानने एका वाहिनीशी चर्चा करताना सांगितलं की, 2012 च्या भारत-पाक मालिकेवेळी गंभीर त्याच्याविरुद्ध खेळायला भीत होता. त्यानंतर गंभीरची कारकिर्द संपुष्टात आली. गंभीरने त्या मालिकेनंतर फक्त एक एकदिवसीय मालिका खेळली. त्यानंतर गंभीरला संघातून बाहेर बसावं लागलं.

जेव्हा मी भारताविरुद्ध खेळलो तेव्हा गौतम गंभीर माझ्यासमोर टिकू शकला नाही. 2012 मध्ये माझ्या उंचीमुळे माझ्या चेंडूचा अंदाज त्याला येत नव्हता. यामुळेच गंभीरची कारकिर्दी उद्ध्वस्त झाल्याचा दावा इरफानने केला आहे. तो म्हणाला की, गंभीर माझ्या उंचीमुळे फलंदाजी करायला भीत होता. मला नेहमीचं वाटायचं की तो माझ्याशी डोळे भिडवण्यापासून लपत होता.

वाचा : फलंदाजाला बोल्ड झाल्याचं कळालच नाही, पाहा शमीचा तुफानी इनस्विंग

गंभीरला 2012 मध्ये झालेल्या सामन्यात असं वाटत होतं की, माझा चेंडू 130-135 किमी प्रतितास वेगानं येईल पण प्रत्यक्षात मी 145 किमी वेगानं गोलंदाजी करत होतो. अशा परिस्थितीत गंभीर चेंडू पूल करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होता. त्यातच गंभीर बाद झाला. त्याच मालिकेत गंभीर त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला होता.

Loading...

पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद इरफानची उंची 7 फूट 1 इंच असून त्याने फक्त 4 कसोटी सामने खेळले आहेत. यात दहा गडी बाद केले आहेत. तर 60 एकदिवसीय सामन्यात 83 गडी बाद केले आहेत. याशिवाय 20 टी20 सामन्यात 15 गडी बाद केले आहेत.

वाचा : वडील मजूर, पुरात वाहून गेले घर तरी आपल्या जिद्दीच्या जोरावर टीम इंडियात मिळवलं स्थान!

वाचा : हातात 1.3 कोटींचं घड्याळ घालून उपचार घेतोय भारतीय क्रिकेटपटू

SPECIAL REPORT: रोहिणी खडसेंना शिवसेनेचा खोडा, मुक्ताईनगरमध्ये युतीला तडा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2019 01:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...