अशी उलगडली पी.व्ही. सिंधूनं आपल्या यशाची गुपितं!

अशी उलगडली पी.व्ही. सिंधूनं आपल्या यशाची गुपितं!

कार्यक्रमात बिर्ला कॉलेज, बिर्ला स्कूल व सेंचुरीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, त्यात पी. व्ही सिंधूनं तिच्या जीवनाची गुपितं उलगडत बऱ्याच सकारात्मक गोष्टी सांगितल्या.

  • Share this:

21 डिसेंबर : बिर्ला स्कूलमध्ये एक दिमाखदार सोहळा पार पडला. त्यातलं मुख्य आकर्षण म्हणजे भारताची ऑलिंपिक खेळाडू पी. व्ही. सिंधू हिचं आगमन. या कार्यक्रमात बिर्ला कॉलेज, बिर्ला स्कूल व सेंचुरीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, त्यात पी. व्ही सिंधूनं तिच्या जीवनाची गुपितं उलगडत बऱ्याच सकारात्मक गोष्टी सांगितल्या.

या कार्यक्रमात सिंधू हिनं सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यात ती म्हणाली की, 'प्रत्येकाने आपल्या आवडीनुसारच काम केलं पाहिजे. एखाद्याला पाहून ती गोष्ट कधीच करु नका. आवडीनुसार काम केलं तरच त्या गोष्टीचं सुख तुम्हाला मिळेल आणि यशस्वी देखील व्हाल.'

आपल्या यशाचे सर्व श्रेय आपल्या गुरूंना व संपूर्ण कुटुंबाला देते पुढे ती म्हणाली की, 'मी सरावादरम्यान व मॅचेसच्या आधी 3 महिने तरी माझा मोबाईल दूर ठेवते, जेणेकरून माझे संपूर्ण लक्ष हे माझ्या खेळाकडेच राहील. मी सरावापुढे खूप गोष्टींचा त्याग केला पण त्याचं मला कधीच दुःख वाटत नाही.'

जाता जाता सिंधूने सर्व विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे 'जीवनात खूप चढ-उतार येतात पण त्याला न घाबरता शेवटपर्यंत लढत रहा तर विजय हा तुमचाच होईल. मला सुध्दा खूप वेळा अपयश आलं आहे. तेव्हा माझे गुरू मला सांगायचे की

'तू का हरली याचा विचार करण्यापेक्षा पुढे कशी तू यश मिळवशील याचाच विचार कर' आणि म्हणून मी आज यशाची ही उंच शिखरं चढू शकले आहे.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2017 04:54 PM IST

ताज्या बातम्या