सचिननं शेअर केला VIDEO; 'तुम्हीच सांगा हा आऊट की नॉट आऊट?'

तुम्ही जर अंपायर असाल तर काय निर्णय दिला असता, असा प्रश्न खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने विचारला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2019 06:44 PM IST

सचिननं शेअर केला VIDEO; 'तुम्हीच सांगा हा आऊट की नॉट आऊट?'

नवी दिल्ली, 24 जुलै: क्रिकेटच्या मैदानावर कधी काय होईल याचा अंदाज लावणे शक्य होत नाही. अनेकदा फलंदाज, गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षकाकडून अफलातून अशी कामगिरी होते. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कपमध्ये देखील असे अनेक प्रसंग झाले जे क्रिकेटविश्वाने आतापर्यंत कधीच पाहिले नव्हते. फायनलमधील थरार तर याआधी कोणीच पाहिला नव्हता. आता क्रिकेटमध्ये याआधी कधीच न घडलेल्या एका प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इतक नव्हे तर आता हा व्हिडिओ चक्क मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील शेअर केला आहे.

माझ्या मित्राने हा व्हिडिओ मला शेअर केला. क्रिकेटमध्ये अशा प्रकारची घटना पाहायला मिळत नाही. तुम्ही जर अंपायर असाल तर काय निर्णय दिला असता, अशा ओळींसह सचिनने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

काय आहे व्हिडिओत

सचिनने शेअर केलेल्या व्हिडिओत, क्रिकेटचा सामना सुरू आहे. गोलंदाज चेंडू टाकतो आणि तो फलंदाजाला चकवा देत विकेटला लागतो. पण ना विकेट पडते ना त्यावरील बेल्स. चेंडू विकेटला स्पर्श करुन जातो आणि त्यावरील एक बेल्स फक्त बाजूला होते. संबंधित बेल्स खाली पडत नाही. गोलंदाजी करणाऱ्या संघाचे सर्व खेळाडू आऊटसाठी अपिल करतात. पण अंपायर विकेट जवळ येऊन बेल्स पुन्हा आहे तशी ठेवतात आणि गोलंदाजाकडे उभे असलेल्या मुख्य अंपायरशी चर्चा करून फलंदाज बाद नसल्याचे जाहीर केले. क्रिकेटमध्ये याआधी देखील कदाचित असा प्रकार झाला असेल पण त्याचा व्हिडिओ प्रथमच समोर आला आहे. सचिनने शेअर केलेल्या या व्हिडिओवर 2 हजाराहून अधिक जणांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Loading...

धर्मसेना झाले ट्रोल

अंपायरने दिलेल्या या निर्णयानंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाने नाराजी व्यक्त केली. विशेषत: ज्या गोलंदाजाने बॉल टाकला होता त्याने मैदानावरच राग व्यक्त केला. या व्हिडिओवर नेटिझन्सनी श्रीलंकेचे पंच कुमार धर्मसेना यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. युझर्स म्हणाले धर्मसेना असते तर या ठिकाणी फलंदाजाला बाद दिले असते.

VIDEO : भन्नाट देसी जुगाड, बाईकवर बसले तब्बल 11 जण!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2019 06:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...