देशाचे नाव गाजवायचे आहे; पण ऑलिंम्पिक पदक विजेत्या खेळाडूला मिळत नाहीय व्हिसा

एखाद्या सामान्य नागरिकाला काही कारणामुळे सरकारी कामात अडचणी आल्या तर समजून घेता येऊ शकते. पण...

News18 Lokmat | Updated On: Oct 8, 2019 12:58 PM IST

देशाचे नाव गाजवायचे आहे; पण ऑलिंम्पिक पदक विजेत्या खेळाडूला मिळत नाहीय व्हिसा

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर: एखाद्या सामान्य नागरिकाला काही कारणामुळे सरकारी कामात अडचणी आल्या तर समजून घेता येऊ शकते. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उंचावणाऱ्या एखाद्या व्यक्तीवर अशी वेळ आली तर धक्कादायक म्हणावे लागेल. असाच काहीसा अनुभव भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) हिला आला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सायना पुढील आठवड्यात डोनमार्क ओपन (Denmark Open)स्पर्धेत सहभागी होणार आहे. स्पर्धा तोंडावर आली असताना देखील सायनाला अद्याप डोनमार्कचा व्हिसा मिळालेला नाही.

आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सायनाने देशाची मान उंचावेल अशी कमगिरी केली आहे. पण डेनमार्क येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी तिला अद्याप व्हिसा मिळालेला नाही. व्हिसा मिळवण्यासाठी सायनाला सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागला आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे मदत मागावी लागली. सायनाने परराष्ट्र मंत्री जयशंकर(Jaishankar) यांना ट्वीटकरून सांगितले की, माझे आणि माझ्या ट्रेनरला डेन्मार्कला जाण्यासाठी व्हिसा हवा आहे. तो लवकरात लवकर मिळावा अशी विनंती. ही स्पर्धा पुढील आठवड्यात हेणार आहे आणि अद्याप आम्हाला व्हिसा मिळालेला नाही. आमचा सामना मंगळवारपासून सुरू होत आहे.

जागतिक क्रमवारीत क्रमांक 8 वर असलेल्या सायनाने गेल्यावर्षी डेन्मार्क ओपन स्पर्धेच उपविजेतेपद मिळवले होते हे विशेष. गेल्या वर्षी चीनी ताईपेच्या ताई जु यिंगने तिचा अंतिम सामन्यात पराभव केला होता. यावर्षी सायनाचा पहिला सामना जपानच्या सायका ताकाहाशी विरुद्ध आहे. सायना सोबत भारताची आणखी एक स्टार खेळाडू पीव्ही सिंधू (PV Sindhu) देखील या स्पर्धेत भाग घेत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील गेल्या काही स्पर्धांमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंना विजयासाठी संघर्ष करावा लागत आहे. सिंधू, सायना आणि बी.साई प्रणीत या आघाडीच्या खेळाडूंना कोरिया ओपनच्या पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला होता. सिंधूचा अमेरिकेच्या बीवान झांगकडून 7-21, 24-22, 15-21 असा पराभव झाला होता. तर सायना आणि प्रणीत दुखापतीमुळे बाहेर पडले होते. डेन्मार्क ओपन बीडब्ल्यूएफ सुपर 750 स्पर्धा 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान ओडेन्स येथे खेळली जाणार आहे.

Loading...

युतीला मेगाभरती पडली भारी, बंडोबांनी दंड थोपडले दारोदारी, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2019 12:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...