दुबई ओपन सिरीज बॅटमिंटनमध्ये पीव्ही सिंधूची फायनलमध्ये धडक

दुबई ओपन सिरीज बॅटमिंटनमध्ये पीव्ही सिंधूची फायनलमध्ये धडक

  • Share this:

16 डिसेंबर : भारतीय बॅटमिंटन स्टार खेळाडू पीव्ही सिंधूची विजयी घोडदौड सुरूच आहे. दुबई ओपन सुपर सीरीजमध्ये चीनची खेळाडू चेन यूफेईचा सरळ सेटमध्ये पराभव करत सिंधूने फायनलमध्ये धडक मारली आहे.

दुबई सुपर सीरीजच्या सामन्यात पीव्ही सिंधूने चेन युफायचा 59 मिनिटांत 21-15, 21-18 ने पराभव केलाय. आता फायनलमध्ये सिंधुचा मुकाबला बॅटमिंटनमध्ये जगात दुसऱ्या स्थानावर असलेल्या जपानची खेळाडू अकाने यामागुचीसोबत होणार आहे. यामुगचीने सेमीफायनलमध्ये थायलंडची रतचानोक इंतानोनचा 17-21, 21-12,21-19 ने पराभव केला.

फायनलमध्ये सिंधूला प्रबळ दावेदार मानलं जातंय. आतापर्यंत भारतीय खेळाडूंचा यामागुचीसोबत पाच वेळा लढत झाली. या पाचही सामन्यात त्यांनी विजय मिळवलाय. सिंधूनेही याआधी यामागुचीचा 21-9 21-13 पराभवन केलाय. तसंच हाँगकाँगमध्येही सिंधूने तिला पराभूत केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 16, 2017 11:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading