video: ... तर सचिन कधी क्रिकेट खेळू शकला नसता; स्वत: केला मोठा खुलासा!

सचिनने करिअरमधील मोठा खुलासा केला

News18 Lokmat | Updated On: Oct 25, 2019 08:55 PM IST

video: ... तर सचिन कधी क्रिकेट खेळू शकला नसता; स्वत: केला मोठा खुलासा!

मुंबई, 25 ऑक्टोबर: क्रिकेटमधील महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने स्वत:च्या करिअरमधील सर्वात मोठा खुलासा केला आहे. क्रिकेटमध्ये सर्वाधिक 100 शतके आणि 30 हजारहून अधिक धावा करणाऱ्या सचिनची निवड समितीने पहिल्या चाचणीत निवड केली नव्हती. लक्ष्मणराव दुरे शाळेतील मुलांसोबत बोलताना सचिनने करिअरमधील मोठा खुलासा केला.

मी जेव्हा निवड समिती समोर चाचणी दिली तेव्हा त्यांनी माझी निवड केली नाही. ते म्हणाले, तुला आणखी कठोर मेहनत करण्याची आणि खेळाच सुधारणा करण्याची गरज आहे. हे ऐकल्यानंतर मी खुप निराश झालो. तोपर्यंत मला वाटत होते की मी खुप चांगली फलंदाजी करतो. पण प्रत्यक्षात त्याच्या मते तसे नव्हते. या घटनेनंतर मी आणखी मेहनत घेतली आणि क्षमता वाढवली. मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा माझ्या डोक्यात एकच गोष्ट होती ती म्हणजे मला देशासाठी खेळायचे आहे. माझ्या या स्वप्नाचा प्रवास अकराव्या वर्षी सुरु झाला होता. तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील तर त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या शॉर्ट-कट नसतो. अशा प्रकारच्या शॉर्ट-कटपासून स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत मिळत नाही.

सचिनने कसोटीमध्ये 15 हजार 921 तर वनडे मध्ये 18 हजार 426 धावा केल्या आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये 100 शतके करणारा सचिन हा एकमेव फलंदाज आहे. क्रिकेटमध्ये मिळवलेल्या यशाचे श्रेय सचिनने कुटुंबियांना आणि प्रशिक्षक रमाकांत अचरेकर यांना दिले. माझ्या यशाचे सर्व श्रेय कुटुंबातील सदस्यांना जाते. त्याच्या मदतीमुळेच मी यश मिळवले. प्रथम आई-वडील त्यानंतर भाऊ अजित आणि नितिन यांनी साथ दिली. माझ्या मोठ्या बहिणीने मला सर्वात पहिली क्रिकेटची बॅट दिली. लग्नानंतर पत्नी अंजली आणि मुलगी सारा व मुलगा अर्जुन यांनी देखील साथ दिल्याचे सचिन म्हणाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2019 08:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...