Elec-widget

दिग्गज क्रिकेटपटू म्हणाला, 'अशी कामगिरी फक्त टीम इंडियाच करू शकते'

दिग्गज क्रिकेटपटू म्हणाला, 'अशी कामगिरी फक्त टीम इंडियाच करू शकते'

क्रिकेट जगतामध्ये असा एकच संघ आहे जो ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करू शकतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 डिसेंबर: क्रिकेट जगतामध्ये असा एकच संघ आहे जो ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करू शकतो. हा संघ म्हणजे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया होय. हे विधान कोणा भारतीय आजी-माजी खेळाडूने नव्हे तर एका परदेशी खेळाडूने केले आहे. नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला. टी-20 मालिके पाठोपाठ ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेत देखील दणदणीत विजय मिळवला. या वर्षात ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर 5 कसोटी सामने खेळले. त्यातील 4 मध्ये त्यांचा विजय झाला तर एक सामना ड्रॉ राहिला. हा ड्रॉ झालेला सामना ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध खेळला होता.

पाकिस्तान(Pakistan)विरुद्धच्या शानदार कामगिरीनंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉर्न यांना ऑस्ट्रेलिया(Australia) संघाचे कौतुक केले. पण त्याच बरोबर हे देखील सांगितले की, विद्यमान परिस्थिती क्रिकेटमध्ये असा एकच संघ आहे जो ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर पराभूत करू शकतो. केवळ भारतीय संघच आहे जो अशी कामगिरी करू शकतो. भारतीय संघ पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या पार्श्वभूमीवर वॉर्नच्या वक्तव्याला महत्त्व येते. ऑस्ट्रेलियाचा संघ शानदार कामगिरी करत आहे. डेव्हिड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ हे दोघेही जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. वॉर्नरने अखेरच्या कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावले होते. केवळ भारतीय संघाकडे ऑस्ट्रेलियाचा पराभव करण्याची क्षमता आहे.

पाकिस्तानचा विक्रमी पराभव...

Loading...

ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध सलग पाच कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे. तर पाक संघाने ऑस्ट्रेलियामध्ये 1999 ते 2019 या काळात एकही कसोटी जिंकलेली नाही. कोणत्याही संघाने परदेशात सर्वाधिक कसोटी सामने गमवण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर झाला आहे. या क्रमवारीत बांगलादेशचा क्रमांक लागतो. त्यांनी 2001 ते 2004 या काळात 13 कसोटी सामने गमावले होते. भारतीय संघाने 1948 ते 1977 या काळात सलग 9 पराभव पाहिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2019 03:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com