Lockdownमध्ये पिझ्झा खाण्याची हौस पडली 50 हजारांना; क्रिकेटपटूला बसला फटका

Lockdownमध्ये पिझ्झा खाण्याची हौस पडली 50 हजारांना; क्रिकेटपटूला बसला फटका

ऑनलाइन फूड ऑर्डर करण्यातून एका क्रिकेटरला (Cricketer) चांगलाच फटका बसला आहे. त्याला पिझ्झा (Pizza) खाण्याची हौस भलतीच महागात पडली आहे.

  • Share this:

ग्वाल्हेर, 17 एप्रिल: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वेगानं वाढत असल्यानं सध्या देशभरातील अनेक राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, शनिवार आणि रविवारी लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातही (Madhya Pradesh) सध्या संचारबंदी (Curfew) लागू करण्यात आला आहे. यामुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स यांना होम डिलिव्हरीची (Home Delivery) परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलात जाणे शक्य नसल्यानं ऑनलाइन फूड ऑर्डर (Online Food Order) करण्याचे प्रमाण वाढले आहे. या ऑनलाइन फूड ऑर्डर करण्यातून एका क्रिकेटरला (Cricketer) चांगलाच फटका बसला आहे. त्याला पिझ्झा (Pizza) खाण्याची हौस भलतीच महागात पडली आहे. 300 रुपयांचा पिझ्झा त्याला 50 हजारांना पडला असून, पिझ्झा तर मिळालाच नाही वर पैसेही गेले आहेत.

दैनिक भास्करनं दिलेल्या वृत्तानुसार, ग्वाल्हेर (Gwalior) इथं ही घटना घडली असून, विक्रांत सिंह भदोरीया (Vikrant Singh Bhadauria) असं या क्रिकेटपटूचं नाव आहे. भारताच्या 19 वर्षांखालील मुलांच्या संघातून त्यानं स्पर्धेत भाग घेतला आहे. सध्या तो मध्यप्रदेशातील विजय हजारे करंडक स्पर्धेच्या संघातील खेळाडू आहे. गुरुवारी संचारबंदीच्या काळात त्यानं घरी पिझ्झा मागवण्याचं ठरवलं आणि त्यासाठी मोबाइलवरून डॉमिनोज पिझ्झाचा नंबर शोधला. त्या वेळी त्याला एक नंबर मिळाला. त्यावर फोन करून त्यानं 300 रुपये किमतीच्या चीज पिझ्झाची ऑर्डर दिली. फोनवर संभाषण साधणाऱ्या व्यक्तीनं त्याची ऑर्डर लिहून घेतली आणि बिल भरण्यासाठी एक लिंक पाठवली. ती लिंक ओपन करताच एक अ‍ॅप डाउनलोड झालं आणि त्यानंतर त्याचा मोबाइल आपोआप ऑपरेट होऊ लागला. थोड्याच वेळात विक्रांतच्या बँक खात्यातून 49 हजार 996 रुपये वजा झाल्याचा संदेश त्याला मिळाला. विक्रांतला आपण फसवले गेल्याचं लक्षात आलं, त्यानं ताबडतोब आपलं बँक खातं ब्लॉक केलं. शुक्रवारी त्यानं ग्वाल्हेरमधील क्राईम ब्रान्चकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी याबाबत एफआयआर दाखल केली असून, चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Explainer : Covid-19 Vaccine पासपोर्ट म्हणजे काय रे भाऊ?

दरम्यान, पोलिसांनी तातडीनं कारवाई केली असती, तर पैसे परत मिळवणे शक्य झालं असतं पण पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप विक्रांत सिंह यानं केला आहे. क्राईम ब्रान्चमध्ये तक्रार नोंदवायला गेल्यावर पोलिसांनी दखल घेतली नाही; अखेर एसपींशी संपर्क साधल्यावर कारवाई झाल्याचं विक्रांत सिंह यानं सांगितलं.

सायबर झोनचे एसपी सुधीर अग्रवाल यांनी अशा प्रकारच्या फसवणुकीबाबत सावधानता बाळगण्याचा इशारा दिला होता. कोणत्याही कंपनीचा नंबर हवा असेल तर इंटरनेटवर थेट त्याचा शोध घेण्याऐवजी त्या कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन नंबर शोधा. योग्य नंबर मिळेल, असा सल्ला त्यांनी दिला होता. नंबरच्या बाबतीत ऑनलाइन रिव्ह्यू बघावा. कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये. शेवटच्या व्यवहाराची माहिती देऊ नये. ऑनलाइन फ्रॉडपासून (Online Fraud) वाचण्यासाठी संशय वाटणाऱ्या ईमेल्स, फोन, मेसेज याकडे दुर्लक्ष करावे. कोणालाही ओटीपी (OTP) देऊ नये. अनोळखी व्यक्तीला आपली जन्मतारीख देऊ नये. आपल्या बँक खात्याची माहिती देऊ नये,असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

First published: April 17, 2021, 5:55 PM IST

ताज्या बातम्या