वर्ल्ड कपचं तिकीट मिळताच 'या' क्रिकेटपटूनं दिला नरेंद्र मोदींना पाठिंबा

वर्ल्ड कपचं तिकीट मिळताच 'या' क्रिकेटपटूनं दिला नरेंद्र मोदींना पाठिंबा

या भारतीय खेळाडूची बायको भाजपकडून लोकसभा निवडणुक लढवत आहे.

  • Share this:

मुंबई, 16 एप्रिल : इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतानं सोमवारी 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली. यात एका अश्या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे, ज्याची चर्चा कुठेच नव्हती. ना हा खेळाडू विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलिया किंवा न्युझीलंड विरोधातल्या मालिकेत संघात होता.

हा खेळाडू आहे, रविंद्र जडेजा. जो सोशल मीडियावर सर रविंद्र जडेजा म्हणून चर्चेत आहे. जडेजाची विश्वचषकाच्या 15 खेळाडूंमध्ये वर्णी लागली आहे. मात्र, जडेजा हा बराच काळ आतंरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटपासून दूर होता. दरम्यान, हार्दिक पांड्यानं माघार घेतली, म्हणून त्याची वर्णी लागली. पण त्याला मिळालेल्या संधीचंही त्याला सोनं करता आलं नाही. त्यामुळेच जडेजाची निवड सर्वांना आश्चर्यात टाकणारी ठरत आहे.

दरम्यान, आता वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे, कारण संघ निवडीनंतर लगेचच जडेजानं लोकसभा निवडणुकीत आपण भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत असल्याचे ट्विटरवरुन जाहीर केले.

त्यामुळं आता जडेजाच्या निवडीमागो नरेंद्र मोदी यांचे कनेक्शन तर नाही ना अशा चर्चा नेटकरी करु लागले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी जडेजाची पत्नी रिवाब हिनं भाजपमध्ये प्रवेश केला होता. रिवाबा सध्या जामनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणुक लढवत आहे. तर, जडेजाच्या वडीलांनी आणि बहिणनं गेल्या महिन्यातच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण, जडेजानं मात्र आपल्या बायकोची साथ देत, भाजपला पाठींबा जाहीर केला आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जडेजाचं आभार मानत, त्याला आगामी विश्वचषक स्पर्धेसाठीही शुभेच्छा दिल्या आहेत.

मात्र ट्विटरवर जडेजाला ट्रोल करण्यात आलं आहे. तु देशासाठी खेळतो, त्यामुळं कोणत्याही पक्षाला तु समर्थन देऊ शकत नाहीस, अशी टीका त्याच्यावर केली जात आहे.

तर, काहींनी म्हणून, वर्ल्ड कपच्या संघात रविंद्र जडेजाचं स्थान पक्कं झालं असं म्हणत ट्रोल करण्यात आलं.

याआधी भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर यांन नवी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान गंभीर लोकसभा निवडणुक लढवत नसला तरी, तो भाजपचा प्रचार करत आहे.

VIDEO : सुशीलकुमार शिंदे झाले भावुक, निवडणुकांबद्दल घेतला मोठा निर्णय

First published: April 16, 2019, 8:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading