1,514 दिवसांपूर्वी झाली होती 'या खेळाडूची निवड, आता घेणार रोहित शर्माची जागा

1,514 दिवसांपूर्वी झाली होती 'या खेळाडूची निवड, आता घेणार रोहित शर्माची जागा

रणजी गाजवणारा हा मुंबई खेळाडू आता आयपीएल गाजवण्यास सज्ज.

  • Share this:

मुंबई, 10 एप्रिल : आयपीएल म्हणजे युवा खेळाडूंसाठी एक आपला खेळ दाखवण्याची एक चांगली संघी असते. पण आजही आयपीएलच्या संघात असे काही खेळाडू आहेत, जे आपल्या संघाशी एवढे एकनिष्ठ आहेत की, एकही सामना न खेळता ते संघात आहेत.

असा एक खेळाडू मुंबई इंडियन्स संघाकडून अखेर 1514 दिवसांनी आज पर्दापण करणार आहे. हा मुंबईकर खेळाडू आहे सिध्देश लाड. विशेष म्हणजे सिध्देश लाड हा 2015पासून मुंबई इंडियन्स संघाकडं आहे. याचवेळी हार्दिक पांड्यालाही संघात घेण्यात आले होते. एकीएकडं हार्दिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करत आहे तर, सिध्देश लाडची हवा आहे ती प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये.

23 मे 1992ला मुंबईच जन्म झालेल्या सिध्देशला जणु बालवयातचं क्रिकेटचे बाळकडू मिळाले. कारण त्याचे बाबा दिनेश लाड हे मुंबई रणजी क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक त्यामुळं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणी प्रमाणं सिध्देशनं क्रिकेटचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. 2013 पासून सिद्धेश प्रथम श्रेणीत मुंबई संघाकडून खेळत आहे. 2015मध्ये सिद्घेशला मुंबई इंडियन्स संघाने विकत घेतले होते. पण एकही सामना खेळू शकला नाही. मात्र, आज तब्बल 1514 दिवसांनी सिद्धेश पंजाब संघाविरोधात आपल्या होम ग्राऊंडवर पर्दापण करणार आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading