मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /On This Day: 7 डिसेंबरला Team Indiaने केली होती 'ही' ऐतिहासिक कामगिरी

On This Day: 7 डिसेंबरला Team Indiaने केली होती 'ही' ऐतिहासिक कामगिरी

India vs South Africa

India vs South Africa

डिसेंबर 7 हा दिवस टीम इंडियासाठी (Team India) एक संस्मरणीय दिवस आहे.

  नवी दिल्ली, 7 डिसेंबर : डिसेंबर 7 हा दिवस टीम इंडियासाठी (Team India) एक संस्मरणीय दिवस आहे. कारण सहा वर्षांपूर्वी 2015 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ( India vs South Africa ) दिल्ली टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला होता. फिरोजशाह कोटला मैदानावर खेळल्या गेलेल्या चौथ्या टेस्ट मॅचमध्ये भारताने ( India ) दक्षिण आफ्रिकेचा ( South Africa ) 337 धावांनी पराभव केला होता. धावांच्या फरकाच्या बाबतीत भारताचा हा त्यावेळचा सर्वात मोठा विजय होता. त्यावेळी भारताने चार सामन्यांची टेस्ट क्रिकेट मालिका 3-0 अशी जिंकली होती. दिल्ली टेस्टच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 'मॅन ऑफ द मॅच' तर मालिकेत 31 विकेट घेणारा रविचंद्रन अश्विन 'मॅन ऑफ द सीरीज' ठरला होता.

  2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये अजिंक्य रहाणेने झळकावलेली शानदार सेंच्युरी (127) आणि रवीचंद्रन अश्विनच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डाव्यात 334 रन्स केल्या होत्या. अश्विनने 56 रन्स केल्या तर कॅप्टन विराट कोहलीने 44 रन्सचं योगदान दिले होते. तर, आफ्रिकेकडून काईल अॅबॉटने पाच तर डेन पीटने चार विकेट घेतल्या होत्या. अश्विन, रवींद्र जडेजा आणि उमेश यादव या तिघांच्या बॉलिंगपुढे मात्र दक्षिण आफ्रिकेचे बॅट्समन टिकू शकले नाहीत. भारताने पहिल्या इनिंगमध्ये पाहुण्या टीमला केवळ 121 रन्समध्ये गुंडाळले. जडेजाने पाच तर अश्विन-उमेशने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

  भारताने दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन न देता स्वतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. रहाणेचे शतक आणि कॅप्टन कोहलीच्या 88 धावांच्या जोरावर टीम इंडियाने 5 विकेट गमावून 267 रन्स करून आपला दुसरी इनिंग घोषित केली. विजयासाठी 481 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ एबी डिव्हिलियर्स, हाशिम आमला आणि फाफ डूप्लेसिसच्या संघर्षपूर्ण खेळीनंतरही 143 रन्सवर गारद झाला. अश्विनने दुसऱ्या इनिंगमध्ये पाच, उमेशने तीन आणि जडेजाने दोन बळी घेतले. ही मॅच जिंकत भारताने इतिहास रचला होता. कारण धावांच्या फरकाच्या बाबतीत भारताचा हा त्यावेळचा सर्वात मोठा विजय होता.

  दरम्यान, नुकतीच भारत-न्यूझीलंड यांच्यामध्ये टेस्ट मालिका झाली. भारताने न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा टेस्ट सामना 372 धावांनी जिंकत ही मालिका 1-0 ने जिंकली. आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार होता. पण दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचे थैमान सुरु झाले आहे. त्यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.

  First published:

  Tags: South africa, Team india