रनमशीनची नाबाद 11 वर्ष! केवळ 12 धावा करत केली टीम इंडियात एण्ट्री

आज बरोबर 11 वर्षांआधी कोहलीनं भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 02:20 PM IST

रनमशीनची नाबाद 11 वर्ष! केवळ 12 धावा करत केली टीम इंडियात एण्ट्री

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आज अनेक रेकॉर्ड्स आहेत. आज बरोबर 11 वर्षांआधी कोहलीनं भारतीय संघात पदार्पण केले होते. 2008मध्ये श्रीलंकेविरोधाच झालेल्या कसोटी सामन्यात विराटनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले पहिले पाऊल टाकले.

श्रीलंकेविरोधात झालेल्या या सामन्यात विराटनं गौतम गंभीरसोबत सलामीला फलंदाजी केली. याचे कारण म्हणजे विरेंद्र सेहवाग पहिल्याच सामन्यात जखमी झाला त्यामुळं विराटला संघात स्थान मिळाले.

करिअरमधल्या पहिल्याच सामन्यात विराट केवळ 12 धावा करत बाद झाला. त्यानंतर पुन्हा त्याला क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र, याच कोहलीनं आज 20 हजार धावांचा पट्टा गाठला.

कोहलीनं 2009मध्ये पहिली शतकी खेळी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणारा तो फलंदाज बनला. आज याच कोहलीच्या नावावर तब्बल 43 शतक आहेत.

विराटच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11 हजार 520 धावा, कसोटी क्रिकेटमध्ये 6 हजार 613 धावा आणि टी-20मध्ये 369 धावा आहेत. सचिनचे विक्रम मोडणारा विराट हा एकमेव फलंदाज आहे.

Loading...

आयसीसी रॅकिंगमध्ये विराट कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. कर्णधार म्हणूनही विराट यशस्वी ठरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 02:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...