मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

OMG! एकाच बॉलवर दोन वेळा रन आऊट झाला 'हा' बॅट्समन, पाहा VIDEO

OMG! एकाच बॉलवर दोन वेळा रन आऊट झाला 'हा' बॅट्समन, पाहा VIDEO

जेक वेदराल्डचा (Jake Weatherald) एकाच बॉलवर दोनदा रन आऊट होण्याचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.

  • Published by:  News18 Desk
अ‍ॅडलेड, 24 जानेवारी : ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग (BBL) स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. स्पर्धेतील आठही टीम्समध्ये ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्यासाठी चुरस सुरु आहे. 29 जानेवारीपासून या स्पर्धेतील ‘प्ले ऑफ’ चे सामने रंगणार आहेत. त्यामुळे आता शेवटच्या आठवड्यातील प्रत्येक मॅच ही महत्त्वाची आहे. अ‍ॅडलेड स्ट्राईकर्स (Adelaide Strikers) विरद्ध सिडनी थंडर (Sydney Thunder) यांच्यात रविवारी झालेल्या मॅचमध्ये एकाच बॉलवर बॅट्समन दोन वेळा रन आऊट होण्याचा प्रकार घडला आहे. काय घडला प्रकार? या मॅचमध्ये यजमान अ‍ॅडलेड स्ट्राईकर्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. अ‍ॅलेक्स कॅरी (Alex Carey) आणि जेक वेदराल्ड (Jake Weatherald) या जोडीनं अ‍ॅडलेडची सुरुवात केली. या स्पर्धेत गुरुवारी शतक झळकावणारा कॅरी 29 रन काढून आऊट झाला. त्यानंतर बॅटिंगला आलेल्या फिल साल्टसोबत वेदरवेल्डनं बॅटिंग सुरु केली. या मॅचमधील दहाव्या ओव्हरमध्ये ख्रिस ग्रिनच्या (Chis Green) बॉलिंगवर साल्टनं सरळ फटका मारला. तो बॉल अडवण्याच्या प्रयत्नात ग्रिनच्या हाताला लागला आणि नॉन स्ट्राईकर एंडच्या स्टंपला आदळला. त्यावेळी वेदराल्ड याची बॅट हवेत होती. नेमकं काय झालं आहे हे कळायच्या आत वेदराल्ड एक रन काढण्यासाठी पळाला. त्यावेळी त्याला थंडरच्या फिल्डरनं रन आऊट केलं. त्यामुळे एकाच बॉलवर दोन वेळा रन आऊट होण्याचा नकोसा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे. क्रिकेटच्या नियमानुसार तो पहिल्यांदा रन आऊट झाल्याची नोंद अधिकृत धरली जाणार आहे. वेदराल्डचा एकाच बॉलवर दोनदा रन आऊट होण्याचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. अनेक फॅन्सनी त्याच्या खराब ‘रनिंग बिटविन द विकेट्स’वर टीका केली आहे.
First published:

Tags: Cricket

पुढील बातम्या