मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup आयोजित करण्यासाठी आणखी एक देश तयार, BCCI पुढे नवं आव्हान

T20 World Cup आयोजित करण्यासाठी आणखी एक देश तयार, BCCI पुढे नवं आव्हान

यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup) भारतात आयोजन होणार आहे, पण देशातल्या कोरोना संकटामुळे या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 5 जून : यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup) भारतात आयोजन होणार आहे, पण देशातल्या कोरोना संकटामुळे या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. आयसीसीने बीसीसीआयला (BCCI) याबाबतचा निर्णय घेण्यासाठी 28 जूनपर्यंतचा अवधी दिला आहे. त्यातच आता ओमाननेही (Oman) टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनाची इच्छा बोलून दाखवली आहे. जर संधी मिळाली, तर आम्ही नक्कीच टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करू, त्यासाठी आम्ही तयार आहोत, असं ओमान बोर्डाने सांगितलं.

ओमान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख पंकज खिमजी टाईम्स ऑफ इंडियासोबत बोलत होते. या मुद्द्यावर बीसीसीआय आणि आयसीसीने निर्णय घ्यावा. ओमान या स्पर्धेचं संभाव्य स्थळ झालं तर आम्हाला आवडेल, असं पंकज खिमजी म्हणाले.

वर्ल्ड कपचं आयोजन करण्यासाठी आमच्याकडे साधनं आहेत. आयसीसीनेही इकडे आंतरराष्ट्रीय सामने खेळवायला परवानगी दिली आहे. जर टी-20 वर्ल्ड कप युएईमध्ये खेळवला गेला, तर टी-20 वर्ल्ड कपच्या क्वालिफायर मॅच ओमानमध्ये खेळवल्या जाऊ शकतात.

बीसीसीआयला पुढच्या महिन्यात आयसीसीच्या बैठकीत पूर्ण रणनीती ठरवून यावं लागणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे टी-20 वर्ल्ड कपच्या भारतातल्या आयोजनाबाबत आधीच शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. जर वर्ल्ड कप युएईमध्ये खेळवण्यात आला, तरी त्याच्या आयोजनाचे अधिकारी बीसीसीआयकडेच राहतील.

First published:

Tags: Cricket news, T20 world cup