मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Olympics 2021: विजेते खेळाडू ऑलिंपिकचं पदक का चावतात? प्रथेमागे आहे रंजक कारण

Olympics 2021: विजेते खेळाडू ऑलिंपिकचं पदक का चावतात? प्रथेमागे आहे रंजक कारण

आतापर्यंत किती तरी वेळा पाहिलं असेल, की सुवर्णपदक जिंकलेला खेळाडू ते पदक दातांनी चावतो. काय कारण आहे त्यामागचं?

आतापर्यंत किती तरी वेळा पाहिलं असेल, की सुवर्णपदक जिंकलेला खेळाडू ते पदक दातांनी चावतो. काय कारण आहे त्यामागचं?

आतापर्यंत किती तरी वेळा पाहिलं असेल, की सुवर्णपदक जिंकलेला खेळाडू ते पदक दातांनी चावतो. काय कारण आहे त्यामागचं?

नवी दिल्ली, 15  जुलै: ऑलिम्पिक (Olympic 2021) असो किंवा अन्य कोणतीही स्पर्धा, त्यामध्ये भाग घेणारा हा गोल्ड मेडल (Gold Medal) जिंकण्याच्या तयारीने आणि ईर्ष्येनेच सहभागी होत असतो. आपण आतापर्यंत किती तरी वेळा पाहिलं असेल, की सुवर्णपदक जिंकलेला खेळाडू ते पदक दातांनी चावतो (Athlete bite medal). या क्षणाचे व्हिडिओ व्हायरल होऊन जातात, तसंच या विशिष्ट पोझमधले फोटो वर्तमानपत्रांमध्ये छापून येतात; पण हे खेळाडू असं का करतात? यामागे काही खास कारण आहे का? पदक चावण्याची ही प्रथा नेमकी कशी सुरू झाली? (Medal bite reason)

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दडली आहेत त्या पदकांमध्ये. आपल्याला माहिती असेलच, की पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला सुवर्णपदक, दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला रौप्यपदक आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला कांस्यपदक दिलं जातं. पूर्वीच्या काळी हे सुवर्णपदक पूर्णपणे शुद्ध सोन्याचा वापर करून तयार केलं जात होतं. सोनं हे इतर धातूंच्या तुलनेत अधिक नरम आणि लवचिक असतं. त्यामुळे जेव्हा पहिल्या क्रमांकाचे विजेते आपलं सोन्याचं पदक चावायचे, तेव्हा त्यांच्या दातांचे व्रण त्या पदकावर उमटत. आपल्या पदकावर आपली छाप उमटवण्याचा हा एक प्रकार होता. शिवाय असं केल्यामुळे आपल्याला मिळालेलं पदक खरंच सोन्याचं असल्याची खात्रीही त्यांना करता येत होती.

बाईक चालवण्याची हौस तरुणीला पडली भारी! स्कूटी सोडून थेट बुलेटवरच बसली आणि...

पूर्वी पदक चावण्यामागे काही कारण असलं, तरी आता मात्र केवळ छायाचित्रासाठी पोझ म्हणून खेळाडू तसं करतात. आताच्या काळातलं सुवर्णपदक पूर्णपणे शुद्ध सोन्यापासून तयार केलं जात नाही. त्यात मोठ्या प्रमाणात चांदी आणि काही प्रमाणातच सोनं असतं. पुढच्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत (Tokyo Olympics) देण्यात येणाऱ्या सुवर्णपदकात केवळ सहा ग्रॅम सोनं असणार आहे. विशेष म्हणजे या पदकाचं एकूण वजन 556 ग्रॅम आहे. म्हणजेच या ‘सुवर्ण’पदकात 550 ग्रॅम चांदीच असणार आहे.

VIDEO: 4 महिन्यांनी परतला टीम इंडियाचा स्टार, T20 वर्ल्ड कपची तयारी सुरू

गमतीची गोष्ट म्हणजे, चांदी हा धातू सोन्याच्या तुलनेत खूपच टणक असतो. त्यामुळे रौप्यपदक चावल्यास त्यावर दातांचे व्रण उमटत नाहीत; पण तरीही किती तरी वेळा रौप्यपदक विजेतेही दातामध्ये मेडल घेतलेले आपले फोटो काढून घेतात.

कित्येक खेळाडू म्हणतात, की कित्येक वेळा आम्हाला छायाचित्रकारच मेडल चावण्यासाठी सांगतात, जेणेकरून त्यांना चांगला फोटो मिळेल. आजकाल कित्येक खेळाडूंना हे माहितीदेखील नसतं, की आपण मेडल का चावत आहोत. केवळ सगळेच करतात म्हणून तेदेखील अशा प्रकारची पोझ देऊन फोटो काढून घेतात.

First published:

Tags: Olympics 2021