VIDEO : भारतीय मुलांचा भन्नाट स्टंट, पाचवेळा ऑलिम्पिक विजेतीसुद्धा झाली चाहती

भारतात शाळेला जाणाऱ्या दोन मुलांच्या स्टंटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2019 04:58 PM IST

VIDEO : भारतीय मुलांचा भन्नाट स्टंट, पाचवेळा ऑलिम्पिक विजेतीसुद्धा झाली चाहती

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : सध्या सोशल मीडियावर भारतातील दोन मुलांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये शाळेला जाणारा मुलगा आणि मुलगी जिमनॅस्टिकच्या स्टेप्स रस्त्यावर सहजपणे करताना दिसतात. गेल्या काही दिवसांपासून हा व्हिडिओ भारतात मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. आता हाच व्हिडिओ ऑलिम्पिकमध्ये पाचवेळा सुवर्णपदक पटकालेल्या नाडिया कोमेन्सीने शेअर केला आहे.

माजी जिमनॅस्ट असलेल्या नाडिया कोमेन्सीने तिच्या ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना या मुलांचं कौतुक केलं आहे. व्हिडिओमध्ये मुलांनी समरसॉल्ट आणि कार्टव्हिलचे कौशल्य दाखवलं आहे. नाडिया तिच्या परफेक्शनसाठी ओळखली जाते. तिनं अनैवन पॅरलल बार्समध्ये 10 गुण मिळवले होते.

भारताचे क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी याआधीच दोन्ही मुलांचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी म्हटलं होतं की, दोन्ही मुला प्रतिभावान आहेत. जर ही मुलं शोधून कुणी आणली तर त्या मुलांना जिमनॅस्टिक अॅकॅडमीत प्रशिक्षण देता येईल.

आतापर्यंत ही मुलं भारतातील कोणत्या भागातील आहेत ते समजू शकलेले नाही. मात्र, यावर असलेल्या कमेंट पाहता हा व्हिडिओ नागालँडमधील असल्याचं म्हटलं जात आहे. फक्त ऑलिम्पिक चॅम्पियननेच नाही तर जगभरातील अनेक लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Loading...

कोल्हापुरात भररस्त्यावर दोन महिलांचा फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Olympic
First Published: Aug 31, 2019 02:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...