Home /News /sport /

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूवर आली दारोदार भटकण्याची वेळ, पोटासाठी झाला डिलिव्हरी बॉय

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूवर आली दारोदार भटकण्याची वेळ, पोटासाठी झाला डिलिव्हरी बॉय

ऑलिम्पिकमध्ये सुर्वणपदकासह विक्रमी करणाऱ्या खेळाडूवर आली घरोघरी जाऊन खाद्यपदार्थ विकण्याची वेळ.

    नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : कोरोना काळाने संपूर्ण जगाला अतर्क्य अनुभव दिले आहेत. संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारा हा काळ कसोटीचा आहे तसाच काही नवं शिकवणाराही आहे. आर्थिक परिस्थिती तर सगळ्यांचीच रसातळाला गेली आहे. ऑलिम्पिकमध्ये सुर्वणपदकासह विक्रमी कामगिरी करणाऱ्या एका तलवारबाजी खेळाडूला पोटापाण्यासाठी सायकलवरून घरोघरी जाऊन खाद्यपदार्थ देणाऱ्या डिलिव्हरी बॉयची नोकरी करण्याची वेळ आली आहे. व्हेनेझुएलातील 35 वर्षांचा रुबेन लिमार्दो याने सोशल मीडियावर याबाबत एक फोटो शेअर केला आहे. रुबेन याने आठवर्षांपूर्वी झालेल्या लंडन ऑलिंपिकमध्ये तलवारबाजी या खेळात सुवर्ण पदकाची कमाई केली होती. तो आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठीही तयारी करत आहे. पण गेल्या आठवड्यात त्याने ट्विट करून पोलंडमध्ये तो सायकलवरून डिलिव्हरीला जात असल्याचा फोटो टाकला. त्यानी लिहिलं, ‘ प्रत्येकाला आपापलं ध्येय गाठायचंय आणि इतरांसारखी ही नोकरीच आहे.’ तो उबर इट्सच्या एक दिवसाच्या विशेष प्रशिक्षणाला गेला होता असं त्यानी सांगितलं. वाचा-तिकडे शिवम दुबेनं फटाके फोडले, इकडे ट्रोल झाला कॅप्टन कोहली; वाचा काय आहे प्रकरण सध्या कोरोनामुळे कुठल्या स्पर्धा सुरू नाहीत त्यामुळे लिमार्दो आणि तर तलवारबाजांना पैसे मिळण्याचं साधन उपलब्ध नाही. त्यामुळे तो आणि व्हेनेझुएलाच्या राष्ट्रीय टीममधील 20 तलवारबाजही डिलिव्हरी बॉयचं काम करत आहेत. टोकियो ऑलिम्पिक या वर्षी होणार होतं ते पुढं गेलं आहे त्यामुळे स्पॉन्सरनेही पुढच्या वर्षीपासून पैसे देणार असल्याचं स्पष्ट केलंय. कोरोनामुळे भारत-ऑस्ट्रेलिया दौरा होणार रद्द? अनेक राज्यातील सीमा बंद लिमार्दोची कामगिरी लंडनमध्ये 2012 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत तलवारबाजीचं सुवर्ण पदक लिमार्दोनी जिंकलं होतं. 1904 मध्ये क्युबाच्या रामोन फोंट्स यांनी तलवारबाजीत सुवर्णपदक पटकावलं होतं त्यानंतर लॅटिन अमेरिकी देशांतून हे पदक मिळवणारा लिमार्दो आहे. हा विक्रम लिमार्दोच्या नावे आहे. व्हेनेझुएलाचे बॉक्सर फ्रान्सिस्को यांनी 44 वर्षांपूर्वी सुवर्ण दक कमावल होतं त्यानंतर सुवर्ण मिळवणारा लिमार्दो हा दुसरा खेळाडू ठरला. वाचा-क्रिकेट विश्व हादरलं! वर्ल्ड कप संघातील 21 वर्षीय युवा खेळाडूची आत्महत्या सरावानंतर नोकरी हे सर्व तलवारबाज एका जुन्या वर्कशॉपमध्ये भेटून आठवड्यतले पाच दिवस सराव करतात. त्यानंतर अंघोळ करून आपापल्या सायकलींवरून उबर इट्सची डिलिव्हरी करायला जातात. लिमार्दोनी सांगितलं की व्हेनेझुएलामध्ये त्यांना कामाचे खूपच कमी पैसे मिळतात. स्पर्धा नाहीत त्यामुळे त्यांना चरितार्थ चालवण्यासाठी रस्त्यांवर उतरावं लागलं. दोन मुलांचा बाप असलेला लिमार्दो दररोज 50 किलोमीटर सायकल चालवतो आणि आठवड्याला 100 युरो कमवतो. हे करतानाच ऑलिम्पिक स्पर्धेचा सराव मात्र व्यवस्थित सुरू आहे आणि ही नोकरी हा ट्रेनिंगचाच भाग असल्याचं मी मानतो असं लिमार्दोनी सांगितलं.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या