मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

मोठी बातमी : Tokyo Olympic मध्ये कोरोनाचा शिरकाव, 6 दिवसांनी सुरू होणार स्पर्धा

मोठी बातमी : Tokyo Olympic मध्ये कोरोनाचा शिरकाव, 6 दिवसांनी सुरू होणार स्पर्धा

जगातील सर्वोच्च क्रीडा प्रकार म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धा (Olympic 2021) सुरु होण्यास आता अवघ्या सहा दिवसांचा कालावधी उरला आहे. त्याचवेळी ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

टोकयो, 17 जुलै :  जगातील सर्वोच्च क्रीडा प्रकार म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धा (Olympic 2021) सुरु होण्यास आता अवघ्या सहा दिवसांचा कालावधी उरला आहे. 23 जुलैपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी जगभरातील क्रीडापटू टोकयोमध्ये (Tokyo Olympic 2021) दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचवेळी एक धक्कादायक बातमी उघड झाली आहे टोकयोमधील ऑलिम्पिक व्हिलिजेमध्ये एकाला कोरोनाची लागण झाली आहे.

'एएफपी' या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिली आहे. ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्याची ही पहिलीच घटना आहे, असं आयोजन समितीनं सांगितलं आहे. जपानसह जगभरातील कोरोनाचा धोका अद्याप नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे ही स्पर्धा स्थगित करावी अशी मागणी यापूर्वी करण्यात आली होती. त्या मागणीकडं दुर्लक्ष करत जपान सरकार आणि ऑलिम्पिक समितीनं ही स्पर्धा घेण्याचे ठरवले आहे. कोरोना लाटेमनुळे ही स्पर्धा यंदा एक वर्ष उशीरा होत आहे.

शिवम दुबेनं लग्नामध्ये मागितली दुवा! फोटो पाहून नेटीझन्स म्हणाले, 'नुसरत जहां आठवते का?

ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर टोकयोमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. ही आणीबाणी 22 ऑगस्टपर्यंत कायम राहिल. म्हणजेच 23 जुलै ते 8 ऑगस्टपर्यंत होणारं ऑलिम्पिकचं आयोजन पूर्णपणे आणीबाणीच्या काळात होणार आहे. 'देशात भविष्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू नये, म्हणून आणीबाणी लागू करावी लागली,' असं जपानच्या पंतप्रधांनी स्पष्ट केलं आहे.

First published:

Tags: Coronavirus, Olympics 2021