ऑलिम्पिकचं थ्रील अनुभवयाचं आहे ? तिकीट फक्त...

ऑलिम्पिकचं थ्रील अनुभवयाचं आहे ? तिकीट फक्त...

ऑलिम्पिकच्या स्पर्धेला 24 जुलै 2020पासून सुरुवात होणार आहे.

  • Share this:

टोकियो, 10 मे : एकीकडं सर्वांचे लक्ष 30मेपासून सुरु होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाकडे लागले असले तरी, सर्व आतुरतेने वाट पाहत आहेत ती, ऑलिम्पिकची. जगभरातील खेळाडू जवळजवळ 5 वर्षापासून ऑलिम्पिकची तयारी करत आहे. दरम्यान, टोकियो येथे होणाऱ्या २०२० ऑलिम्पिकसाठी तिकिट विक्री सुरु झाली आहे.

त्यामुळं तुम्हाला जर ऑलिम्पिकचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पाहायचा असेल तर तुम्हाला केवळ एक लाख 91 हजार एका तिकीटाचे माजावे लागणार आहे. या सोहळ्याची तिकीट विक्री गुरुवारी सुरू झाली असून उद्घाटन सोहळ्याचे सर्वात महागडे तिकीट हे तीन लाख येनचे म्हणजे जवळपास एक लाख ९१ हजार रुपये असेल. दरम्यान जपानच्या स्थानिक नागरिकांना लॉटरी पद्धतीने तिकिटे उपलब्ध करून दिली जातील.

ऑलिम्पिकमध्ये समावेश असलेल्या विविध 33 खेळांसाठी वेगवेगळ्या किमतीची तिकिटं उपलब्ध आहेत. यात सर्वात कमी किंमतीचे तिकीट हे 1600 रुपयांचे आहे. तर, सर्वात जास्त किमतीचे तिकिट हे एक लाखांचे आहे.

यात सर्वात जास्त पुरुष 100 मीटर शर्यतीसाठी जवळपास ८३ हजार डॉलर किमतीचे तिकीट उपलब्ध आहे. ऑलिम्पिकच्या स्पर्धेला 24 जुलै 2020पासून सुरुवात होणार आहे. तर, 9 ऑगस्टला या स्पर्धेचा शेवट होणार आहे. दरम्यान ही तिकीट विक्री 28 मे पासून सुरु होणार आहे तर, 20 जून रोजी तिकीट विक्री बंद करण्यात येणार आहे. यात लहान मुलांचे पालक, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी 1287 रुपये किमतीच्या तिकिटांची व्यवस्था आहे. स्थानिक नागरिकांसाठी तिकिटांची किंमत २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमधील किमतीइतकीच आहे.

वाचा- DC vs CSK : चेन्नईचं पारडं जड, पण धोनीला दिल्लीच्या 'या' युवा खेळाडूंपासून खतरा !

वाचा- IPL 2019 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना मोठा धक्का, 120 सेकंदात फायनलचं स्वप्न भंगलं

VIDEO: 'आधी पैसे आता मारहाण', प्रियंका गांधींचा भाजपवर गंभीर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2019 09:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading