• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • एबी डिव्हिलियर्सनंतर इंग्लंडचा 'हा' बॉलर निवृत्तीच्या वाटेवर

एबी डिव्हिलियर्सनंतर इंग्लंडचा 'हा' बॉलर निवृत्तीच्या वाटेवर

Olly Stone

Olly Stone

इंग्लंडचा गोलंदाज ऑली स्टोन (Olly Stone) निवृत्तीच्या वाटेवर आहे, अशी माहिती क्रिकेट जगतातून समोर आली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर: दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers ) शुक्रवारी अचानक सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. अशातच क्रिकेट जगतातून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंग्लंडचा गोलंदाज ऑली स्टोन (Olly Stone) निवृत्तीच्या वाटेवर आहे, अशी माहिती समोर आली आहे. स्टोनने 2019 मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर आयर्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले. मात्र, त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीत केवळ तीन कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 10 विकेट्स घेतल्या आहेत. आता तो या प्रकारातून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. जूनमध्ये, स्टोनला पाठीच्या खालच्या भागात दुखू लागले आणि त्याला सीझनमधून बाहेर ठेवण्यात आले. घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात हा खेळाडू जखमी झाला होता. स्कॅनमध्ये स्टोनला तिसरे स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले. स्टोन म्हणाला की, त्याने स्वत:ला पुन्हा कसोटी सामने खेळण्याची संधी दिली पण पुन्हा एकदा या फॉरमॅटमध्ये पुनरागमन करण्यासाठी तो कठोर परिश्रम करू शकेल याची त्याला खात्री नव्हती. बीबीसीच्या ऍशेस पॉडकास्टशी स्टोनने संवाद साधला. "मी स्वत:ला परत येण्याची सर्वोत्तम संधी दिली आणि ते घडवून आणण्यासाठी मी जे काही करू शकतो ते केले. जर याचा अर्थ मी करू शकत नाही, तर माझ्यासाठी कसोटी क्रिकेटला अलविदा म्हणणे चांगले होईल. अशी भावना स्टोनन यावेळी व्यक्त केली. तसेच तो पुढे म्हणाला, मला तिथे पुन्हा खेळायचा प्रयत्न करायचा आहे का याचा मी खूप गांभीर्याने विचार केला. या वेळी मला वाटले की मी मैदानाबाहेर जे करू शकतो ते केले. आहार घेतला, मी पूर्वीपेक्षा फिट आणि मजबूत झालो. सुरुवातीला मला वाटले की कदाचित त्यामुळेच ही दुखापत होत असेल. पण तसे नाही. असे भावनिक मत त्याने यावेळी व्यक्त केले. स्टोनने आपला शेवटचा कसोटी सामना न्यूझीलंडविरुद्ध बर्मिंगहॅम येथे खेळला. कसोटीशिवाय या खेळाडूने इंग्लंडकडून चार एकदिवसीय सामनेही खेळले आहेत, मात्र त्याने केवळ एकच विकेट घेतली आहे. दुसरीकडे, जर आपण त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीबद्दल बोललो तर त्याने 44 सामने खेळले आहेत आणि 150 बळी घेतले आहेत. लिस्ट-ए सामन्यांमध्ये त्याने 30 सामने खेळले असून 24 बळी घेतले आहेत. त्याने T20 मध्ये 51 सामने खेळले असून 48 विकेट्स त्याच्या नावावर आहेत.
  Published by:Dhanshri Otari
  First published: