मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /इंग्लंड क्रिकेटमध्ये वादळ, पंतप्रधानांपर्यंत पोहोचला रॉबिनसनच्या निलंबनाचा वाद

इंग्लंड क्रिकेटमध्ये वादळ, पंतप्रधानांपर्यंत पोहोचला रॉबिनसनच्या निलंबनाचा वाद

इंग्लंडचा फास्ट बॉलर ओली रॉबिनसनच्या (Ollie Robinson) वादग्रस्त ट्वीटचं प्रकरण आता पंतप्रधान बोरिस जॉनसन (PM Boris Johnson) यांच्यापर्यंत पोहोचलं आहे.

इंग्लंडचा फास्ट बॉलर ओली रॉबिनसनच्या (Ollie Robinson) वादग्रस्त ट्वीटचं प्रकरण आता पंतप्रधान बोरिस जॉनसन (PM Boris Johnson) यांच्यापर्यंत पोहोचलं आहे.

इंग्लंडचा फास्ट बॉलर ओली रॉबिनसनच्या (Ollie Robinson) वादग्रस्त ट्वीटचं प्रकरण आता पंतप्रधान बोरिस जॉनसन (PM Boris Johnson) यांच्यापर्यंत पोहोचलं आहे.

लंडन, 7 जून : इंग्लंडचा फास्ट बॉलर ओली रॉबिनसनच्या (Ollie Robinson) वादग्रस्त ट्वीटचं प्रकरण आता पंतप्रधान बोरिस जॉनसन (PM Boris Johnson) यांच्यापर्यंत पोहोचलं आहे. जॉनसन यांनी इंग्लंडच्या क्रीडा मंत्र्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे, तसंच इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. ब्रिटनचे क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री ओलिव्हर डाऊडेन (Oliver Dowden) यांनी सोमवारी रॉबिनसनच्या निलंबनाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडे (ECB) केली होती.

ओली रॉबिनसनने न्यूझीलंडविरुद्धच्या (England vs New Zealand) आपल्या पदार्पणाच्या टेस्ट मॅचमधून बॉलिंग आणि बॅटिंगने प्रभावित केलं. 2012 आणि 2013 साली रॉबिनसने केलेल्या ट्वीटप्रकरणी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने चौकशीचे आदेश दिले. या चौकशीचा निकाल येईपर्यंत रॉबिनसनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून निलंबित करण्यात आलं आहे.

पंतप्रधान जॉनसन यांचे प्रवक्ते सोमवारी म्हणाले, 'ओलिव्हर डाऊडेन जसं म्हणाले त्याप्रमाणे हे ट्वीट एका दशकापूर्वीचं आहे. तेव्हा रॉबिनसन लहान होता. तसंच त्याने माफीही मागितली.' त्याआधी डाऊडेन यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं होतं. 'ओलीचे ट्वीट वादग्रस्त आणि चुकीचे होते. एका दशकाआधी लहान मुलाने केलेले ते ट्वीट होते. आता तो मुलगा माणूस झाला आहे आणि त्याने माफीही मागितली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याला निलंबित केलं आहे, त्यामुळे याचा पुनर्विचार झाला पाहिजे,' अशी प्रतिक्रिया डाऊडेन यांनी दिली.

इंग्लंडचे माजी कर्णधार डेव्हिड गोवर यांनीही ओली रॉबिनसनला देण्यात आलेली शिक्षा कठोर असल्याचं म्हणलं आहे. 'यातून शिक, असं इसीबीने ओलीला सांगितलं पाहिजे, तसंच त्याला सामुदायिक सेवा करायला लावली पाहिजे. त्यांनी काऊंटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंकडे गेलं पाहिजे आणि सोशल मीडियाचा दुरुपयोग करू नका, असा प्रचार केला पाहिजे,' असं गोवर बीबीसीशी बोलताना म्हणाले.

First published:

Tags: Cricket, England