मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

भलतंच काहीतरी! इंग्लंडच्या टीममध्ये निवड होण्यासाठी आता हा नियम

भलतंच काहीतरी! इंग्लंडच्या टीममध्ये निवड होण्यासाठी आता हा नियम

कोणत्याही खेळाच्या राष्ट्रीय टीममध्ये निवड होण्यासाठी फिटनेस हा निकष असतो, पण आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) मात्र आता टीममध्ये निवड होण्यासाठीचे निकष बदलले आहेत. फिटनेसबरोबरच आता खेळाडूंच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही लक्ष दिलं जाणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 5 मे : कोणत्याही खेळाच्या राष्ट्रीय टीममध्ये निवड होण्यासाठी फिटनेस हा निकष असतो, पण आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) मात्र आता टीममध्ये निवड होण्यासाठीचे निकष बदलले आहेत. फिटनेसबरोबरच आता खेळाडूंच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही लक्ष दिलं जाणार आहे. राष्ट्रीय टीममध्ये निवड होण्याआधी बोर्ड खेळाडूचा सोशल मीडियावरचा इतिहासही पाहण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य इंग्लंडचे प्रशिक्ष ग्रॅहम थोर्प (Graham Thorpe) म्हणाले आहेत.

न्यूझीलंडविरुद्धच्या (England vs New Zealand) टेस्टमधून पदार्पण केलेला ओली रॉबिन्सन (Ollie Robinson) त्याच्या जुन्या ट्वीटमुळे अडचणीत आला होता. 7-8 वर्षांपूर्वी रॉबिन्सनने केलेलं एक ट्वीट व्हायरल झालं. या ट्वीटमध्ये रॉबिन्सनने वर्णद्वेषी आणि लिंगभेदी टिप्पणी केली होती. रॉबिन्सनचं हे ट्वीट त्याच्या पदार्पणानंतर व्हायरल झालं. यानंतर रॉबिन्सनने माफीही मागितली.

'8 वर्षांपूर्वी केलेल्या एका पोस्टमुळे मला लाजीरवाणं वाटत आहे. मी वर्णद्वेषी आणि लिंगभेदी नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो,' असं रॉबिन्सन म्हणाले. दुसरीकडे रॉबिन्सनला त्याची चूक कळाली आणि त्याने ड्रेसिंग रूममध्येही माफी मागितली, असं ग्रॅहम थोर्प बीबीसीशी बोलताना म्हणाले.

रॉबिन्सनने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या इनिंगमध्ये 75 रन देऊन 4 विकेट घेतल्या. पण दुसऱ्या टेस्टमधून रॉबिन्सनला बाहेर काढलं जाऊ शकतं, असंही बोललं जात आहे. रॉबिन्सनच्या त्या ट्वीटची इंग्लंड क्रिकेट बोर्ड चौकशी करत आहे, यात तो दोषी आढळला तर त्याला दंडही होऊ शकतो.

रॉबिन्सनच्या या प्रकरणानंतर बोर्ड आपल्या खेळाडूंची निवड करताना मोठा बदल करू शकतो. मैदानातल्या कामगिरीसोबतच सोशल मीडियावरचं त्यांचं लिखाणही तपासलं जाईल. खेळाडूंनाही सोशल मीडियावर पोस्ट करताना जपून कराव्या लागणार आहेत, अन्यथा त्यांना टीममध्ये प्रवेश मिळवण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

First published:

Tags: Cricket news, England, Social media