जपानच्या ओकुहारानं सरळ सेटमध्ये सिंधूचा केला पराभव

जपानच्या ओकुहारानं सरळ सेटमध्ये सिंधूचा केला पराभव

जपानच्या नोझोमी ओकुहारानं सिंधूचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. २१-१८,२१-८ असा दोन सेटमध्ये ओकुहारानं विजय मिळवला.

  • Share this:

21 सप्टेंबर : जपान ओपन सुपुर सीरिजमधलं पी.व्ही सिंधूचं आव्हान संपुष्टात आलंय. जपानच्या नोझोमी ओकुहारानं सिंधूचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. २१-१८,२१-८ असा दोन सेटमध्ये ओकुहारानं विजय मिळवला. कोरिया ओपनच्या फायनलमध्ये सिंधूनं ओकुहाराचा पराभव केला होता. त्या पराभवाची परतफेड ओकुहारानं केली.

या सामन्यावर पूर्णपणे ओकुहाराचं वर्चस्व राहिलं. अवघ्या ४७ मिनिटात हा सामना संपला. पहिल्या सेटमध्ये सिंधूनं थोडाफार संघर्ष केला. पण दुसऱ्या सेटवर पूर्णपणे ओकुहाराचं वर्चस्व होतं.

२१-८ इतका सहज विजय मिळवला. या पराभवाबरोबरच दुसऱ्या फेरीतच सिंधूचं आव्हान संपुष्टात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2017 02:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading