IPL 2020 : रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला मिळाला ‘पप्पू’! स्थानिक क्रिकेटमध्ये करतोय कमाल

IPL 2020 : रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला मिळाला ‘पप्पू’! स्थानिक क्रिकेटमध्ये करतोय कमाल

पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएल 2020साठी 19 डिसेंबर रोजी खेळाडूंचा लिलाव होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 23 ऑक्टोबर : पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएल 2020साठी 19 डिसेंबर रोजी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. त्यामुळं सर्व संघाची नजर आतापासून युवा खेळाडूंकडे आहे. आपल्या संघात प्रतिभाशाली खेळाडू असावेत, यासाठी संघानी खेळाडूंची ट्रायल घेण्यात सुरुवात केली आहे. दरम्यान आयपीएलच्या इतिहासात सर्वात सफल असणाऱ्या मुंबई इंडियन्स संघानंही आपल्या तयारीला सुरुवात केली आहे.

आयपीएल 2019चा विजेचा संघ मुंबई इंडियन्स 2020मध्येही विजेतेपदासाठी प्रयत्नशील असणार आहे. यासाठी मुंबई इंडियन्स संघानं ओडिसाचा फिरकीपटू पप्पू रॉय याला आपल्या संघात घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळं मुंबई संघात आता आणखी एक हिरा सामिल होणार, असे चिन्ह दिसत आहे.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये झाली पप्पूची चर्चा

24 वर्षांचा पप्पू रॉय 2018-19च्या विजय हजारे करंडक स्पर्धेत सर्वांच्या नजरेत आला होता. त्यानं या स्पर्धेत 8 सामन्यात 18.42च्या सरासरीनं 14 विकेट घेतल्या. या स्पर्धेत ओडिसा संघानं आठपैकी केवळ दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला. मात्र या सामन्यात पप्पू रॉयच्या नावाची चर्चा झाली. ओडिसाकडून सर्वात जास्त विकेट घेणारा पप्पू दुसरा गोलंदाज ठरला. यंदाच्या विजय हजारे करंडक स्पर्धेतही त्यानं चांगली कामगिरी केली.

वाचा-Live सामन्यात मैदानाबाहेर धावत सुटला फलंदाज आणि उतरवली पॅंट, पाहा VIDEO

मुंबई संघानं केले पप्पूचे ट्रायल

पप्पूनं ओडिसा टिव्हीला दिलेल्या मुलाखतीत 19 ऑक्टोबरला मुंबई इंडियन्स संघानं त्याला ट्रायलसाठी बोलवले असे सांगितले. पप्पू याआधी प्रसिडेंट बोर्ड इलेव्हन आणि टीम इंडिया सी संघासाठी खेळला आहे. मुंबई इंडियन्स संघात पप्पू सामिल झाल्यास त्याला मोठे प्लॅटफॉर्म मिळले. मुंबई इंडियन्स संघात असलेल्या प्रशिक्षकांमुळे त्याच्या गोलंदाजीमध्ये सुधारणा होऊ शकते.

वाचा-20 वर्षांआधीची गाडी आणि 90 हजारांचा पायजमा, धोनीचा Rich Look पाहिलात का?

वाचा-BCCI अध्यक्ष होताच धोनीच्या निवृत्तीबद्दल काय म्हणाला गांगुली?

स्थानिक क्रिकेटमध्ये घेतल्या 40 विकेट

पप्पू रॉयनं आपल्या छोट्या करिअरमध्ये दोन प्रथम श्रेणी सामने खेळले आहे. याशिवाय 17 लिस्ट ए सामन्यांमध्ये समावेश झाला आहे. त्याचबरोबर पप्पूनं 7 टी-20 सामनेही खेळले आहेत. यात त्यानं आतापर्यंत एकूण 40 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळं मुंबई इंडियन्स संघात सामिल झाल्यास पप्पूला गोलंदाजीमध्ये चांगला फायदा होऊ शकतो.

Published by: Priyanka Gawde
First published: October 23, 2019, 6:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading