Home /News /sport /

IND vs WI : विराट-रोहितला वेस्ट इंडिज सीरिजआधी धक्का, कामगिरी सुधारावी लागणार, अन्यथा...

IND vs WI : विराट-रोहितला वेस्ट इंडिज सीरिजआधी धक्का, कामगिरी सुधारावी लागणार, अन्यथा...

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या वनडे सीरिजला (India vs West Indies) 6 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. पण या सीरिजआधीच रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीला (Virat Kohli) मोठा धक्का बसला आहे.

    दुबई, 26 जानेवारी : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या वनडे सीरिजला (India vs West Indies) 6 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. पण या सीरिजआधीच रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीला (Virat Kohli) मोठा धक्का बसला आहे. वनडे क्रमवारीमध्ये (ODI Batting Rankings) कोहलीचं 8 पॉईंट्सचं तर रोहितचं 12 पॉईंट्सचं नुकसान झालं आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताचा वनडे सीरिजमध्ये (India vs South Africa) 3-0 ने पराभव झाला. या सीरिजमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या क्विंटन डिकॉक आणि रस्सी व्हॅन डर डुसेनला मोठा फायदा झाला आहे. नव्या क्रमवारीनुसार बाबर आझम 873 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. विराटला 8 पॉईंट्सचं नुकसान झालं असलं तरी तो दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तर रोहित शर्माही आधीसारखाच पहिल्या क्रमांकावर आहे. रोहित आणि न्यूझीलंडच्या रॉस टेलरचे प्रत्येकी 801 पॉईंट्स आहेत. रस्सी व्हॅन डर डुसेनला (Rassie van der Dussen) 10 स्थानांचा फायदा झाला, ज्यामुळे तो 10 व्या क्रमांकावर पोहोचला. रस्सीने भारताविरुद्ध 218 रन केले, यात एका शतकाचा समावेश होता. तर क्विंटन डिकॉकनेही सीरिजमध्ये एका शतकाच्या मदतीने 229 रन केले. डिकॉक 4 स्थान वरती पाचव्या क्रमांकावर आहे. फिंच सहाव्या क्रमांकावर बॅटिंगच्या क्रमवारीत विराट आणि रोहितशिवाय कोणताही भारतीय खेळाडू टॉप-10 मध्ये नाही. ऑस्ट्रेलियाचा एरॉन फिंच सहाव्या, इंग्लंडचा जॉनी बेयरस्टो सातव्या, ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर 8 व्या आणि न्यूझीलंडचा केन विलियमसन 9 व्या क्रमांकावर आहे. बॉलिंगमध्ये भारताचा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा एकमेव भारतीय टॉप-10 मध्ये आहे. 689 पॉईंट्ससह बुमराह 7 व्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा फास्ट बॉलर ट्रेन्ट बोल्ट 737 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा जॉश हेजलवूड दुसऱ्या, इंग्लंडचा क्रिस वोक्स तिसऱ्या, अफगाणिस्तानचा ऑफ स्पिनर मुजीब उर रहमान चौथ्या आणि बांगलादेशचा मेहेदी हसन पाचव्या क्रमांकावर आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Rohit sharma, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या