NZvsSL : हेल्मेटमध्ये अडकला चेंडू, झेलण्यासाठी फलंदाजाच्या मागे धावले फील्डर; पाहा व्हिडिओ

NZvsSL : हेल्मेटमध्ये अडकला चेंडू, झेलण्यासाठी फलंदाजाच्या मागे धावले फील्डर; पाहा व्हिडिओ

न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट याच्या बॅटला लागून चेंडू हेल्मेटमध्ये अडकला. त्यानंतर झेल घेण्यासाठी लंकेचे खेळाडू बोल्टच्या भोवती जमले.

  • Share this:

लंडन, 17 ऑगस्ट : क्रिकेटच्या मैदानावर अनेक मजेशीर घटना घडत असतात. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यावेळी एका प्रसंगाने सर्वांनाच हसू अनावर झालं. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टनं स्वीप फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंडू बॅटला लागून त्याच्या हेल्मेटमध्ये अडकला. तेव्हा यष्टीरक्षकासह क्षेत्ररक्षकही चेंडू झेलण्यासाठी त्याच्या भोवतीनं गोळा झाले.

न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. यावेली लंकेचा फिरकीपटू लसिथ एमबुलदेनियानं टाकलेला चेंडू ट्रेंट बोल्टनं मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॅटची कड घेऊन चेंडू हेल्मटमध्ये अडकला. यावेळी चेंडू झेलण्यासाठी लंकेचे खेळाडू बोल्टच्या भोवती गोला झाले. तेव्हा बोल्ट त्यांच्यापासून दूर पळाला आणि चेंडू काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी लंकेच्या खेळाडूंनी चेंडू काढला.

न्यूझीलंडने पहिल्या डावात 249 धावा केल्या होत्या. त्यानंतर लंकेनं 3 बाद 143 धावांपर्यंत मजल मारली होती. पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवत पुढच्या 70 धावांत 4 गडी बाद केले. लंकेचा दुसरा डाव 267 धावांवर आटोपला. न्यूझीलंडच्या आझाद पटेलनं 5 विकेट घेतल्या. मुंबईत जन्मलेल्या पटेलनं 76 धावांत 5 बळी घेतले.

डॉन आहे का तू? पोलिसांनी तरुणाला पट्ट्याने झोड-झोडपलं, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 17, 2019 12:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading