VIDEO : खेळाडूनं सोडला क्रिकेटमधला सर्वात सोपा कॅच, फलंदाजालाही विश्वास बसला नाही

VIDEO : खेळाडूनं सोडला क्रिकेटमधला सर्वात सोपा कॅच, फलंदाजालाही विश्वास बसला नाही

फलंदाज म्हणाला एवढा सोपा कॅच सोडलास कसा, पाहा क्रिकेटमधला सर्वात वाईट ड्रॉप.

  • Share this:

हॅमिल्टन, 03 डिसेंबर : क्रिकेमध्ये कॅचेस विन मॅचेस (झेलमुळे सामने जिंकतात) असे म्हटले जाते. मात्र कधी कधी एका कॅचमुळे सामन्याचे रुप पालटले जाते. असाच प्रकार न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात घडला. मात्र या सामन्यात एक सोपा कॅच सोडण्यात आला, त्यामुळे या मजेशीर कॅचचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

न्यूझीलंड आणि इंग्लंज (New Zealand Vs England) यांच्यात दुसरा कसोटी सामना हॅमिल्टन (NZ Vs Eng 2nd Test) येथे खेळला गेला. पहिला सामन्यात लाजीरवाणा पराभव मिळाल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही इंग्लंडला यश आले नाही. दोन्ही सामन्यात न्यूझीलंडच्या खेळाडूंनी इंग्लंडला कमबॅक करण्याची संधी दिली नाही. रॉस टेलर (Ross Taylor) आणि केन विल्यमसन (Kane Williamson) मैदानावर तळ टोकून फलंदाजी करत होते, त्यामुळं दुसरा सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात रॉस टेलरनं 105 तर, विल्यमसनने 104 धावांनी नाबाद खेळी केली. मात्र या सामन्यात एक असा प्रकार घडला ज्यामुळं सगळे हैरान झाले. इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी केन किंवा टेलर यांच्या विकेटची गरज होती. मात्र जो डेनलीनं एक सर्वात सोपा कॅच सोडला आणि इंग्लंडची सामना जिंकण्याची संधी हुकली.

वाचा-सौरव गांगुलीने घेतला क्रांतिकारी निर्णय: IPL मध्ये असतील 5 अंपायर!

जोफ्रा आर्चरनं केनला बाद करण्यासाठी धिमा चेंडू टाकला. ज्यावर केननं मिड विकेटला शॉट लगावला. यावेळी जो डेनली मिडविकेटजवळ उभा होता. त्याच्यात हातात थेट चेंडू आला मात्र त्याला कॅच पकडण्यात यश आले नाही. डेनलीनं सोडलेला हा कॅच पाहून जोफ्रासह संघातील सर्वच खेळाडू त्याच्यावर भडकले. सोशल मीडियावर या कॅचचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या कॅचला जगातला सर्वात सोपा कॅच असे नाव देण्यात आले.

वाचा-क्रिकेटच्या मैदानात फलंदाज झाला धावपटू! 21 किमी धावत केला रेकॉर्ड

वाचा-अनोख्या लग्नाची गोष्ट! एका रुपयांत कन्यादान, आठवी फेरी घेतली ‘बेटी बचाओ’साठी

डेनलीनं हा कॅचच नाही तर ही मॅचही सोडली. त्यानंतर केननं इंग्लंडच्या गोलंदाजांची शाळा घेतली. त्यामुळे हा सामना अनिर्णित सुटला. न्यूजीलॅंडने पहिल्यांदा फलंदाजी करत 375 धावा केल्या. इंग्लंडनं या आव्हानाचा पाठलाग करताना 476 धावा केल्या. यात कर्णधार जो रूटनं 226 धावांची खेळी केली. त्यानंतर रॉस टेलर (Ross Taylor) आणि केन विल्यमसन (Kane Williamson) यांनी मैदानात तळ ठोकत सामना ड्रॉ केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2019 01:00 PM IST

ताज्या बातम्या