वेलिंग्टन, 06 फेब्रुवारी: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी एका भारतीय क्रिकेटपटूच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. पहिल्या टी-20 सामन्यात भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही पातळ्यांवर खराब कामगिरी केली. न्यूझीलंडने हा सामना 80 धावांनी जिंकला. टी-20 प्रकारातील हा भारताचा सर्वात मोठा पराभव ठरला आहे.
संबंधित बातमी: IND vs NZ: न्यूझीलंडचा दणदणीत विजय, भारताचा टी-20मधील सर्वात मोठा पराभव
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टिम सेईफर्ट आणि कॉलिन मुन्रो यांनी न्यूझीलंडला शानदार सुरुवात करुन दिली. मुन्नोची विकेट घेत कुणार पांड्याने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर वादळी खेळी करणाऱ्या टिम सेईफर्टला बाद करण्याची संधी भारताला मिळाली होती. कुणालच्या चेंडूवर सेईफर्टने हवेत चेंडू मारला. पण दिनेशकडून हा सोपा कॅच सुटला. आता त्याच्या या चुकीवरुन सोशल मीडियावर त्याच्यावर टीका सुरु झाली. अनेकांनी त्याला ट्रोल केले.
@DineshKarthik is a good field but gloves missing.#NZvIND pic.twitter.com/RGK8Y8qx4E
— Akram Pasha (@akramrockz055) February 6, 2019
त्यानंतर 14व्या षटकात डॅरेल मिचेलने मारलेला चेंडू सीमेच्या बाहेर जात होता. तेव्हा दिनेशने हवेत चेंडू थांबवला आणि चेंडू सीमे रेषेच्या आत टाकला व झेप घेत कॅच घेतला. दिनेशच्या या सुपर कॅचनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली ती म्हणजे दिनेशच्या सुपर कॅचची.
काही मिनिटांपूर्वी कॅच सोडला म्हणून नेटिझन्सनी दिनेशला ट्रोल केले होते त्यांनीच दिनेशवर कौतुकांचा वर्षाव सुरु केला.
An awesome catch by @DineshKarthik for @hardikpandya7 @StarSportsIndia #WhatACatch #AskStar pic.twitter.com/LAqIzYgzLW
— Syed Junaid Zaman (@SyedJunaidZaman) February 6, 2019