ना झाला टॉस, ना झाली मॅच; तरी असा लागला फायनल सामन्याचा निकाल

ना झाला टॉस, ना झाली मॅच; तरी असा लागला फायनल सामन्याचा निकाल

कोरोनाचा फटका क्रिकेट विश्वाला बसल्यामुळे जगभरातील सर्व सामने रद्द करण्यात आले आहेत. मात्र सामना न होताच ऑस्ट्रेलियामधील एका स्पर्धेचा निकाल लागल आहे.

  • Share this:

सिडनी, 17 मार्च : कोरोनाचा फटका क्रिकेट विश्वाला बसल्यामुळे जगभरातील सर्व सामने रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या एकही क्रिकेटचा सामना खेळवला जात नाही आहे. मात्र सामना न होताच ऑस्ट्रेलियामधील एका स्पर्धेचा निकाल लागल आहे. ऑस्‍ट्रेलियात (Australia) होणाऱ्या शेफील्ड शील्ड (Sheffield Shield) या स्पर्धेच्या विजेत्या संघाचे नाव घोषित करण्यात आले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंतिम सामन्यासाठी ना टॉस झाला ना मॅच झाली.

कोरोनामुळे शेफील्ड शील्ड स्पर्धेचा अंतिम सामनाही रद्द करण्यात आला. यामुळे अंकतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या न्यू साउथ वेल्स संघाला विजेते घोषित करण्यात आले. या स्पर्धेचे काही सामने शिल्लक होते, मात्र कोरोनामुळे ही स्पर्धा त्वरित रद्द करण्यात आली. त्यामुळे गुणतालिकेनुसार या स्पर्धेचा निकाल लावण्यात आला. अंकतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विक्टोरिया संघापेक्षा न्यू साऊथ वेल्स संघाकडे 12 गुण जास्त होते. या स्पर्धेत ऑस्ट्रेसियाचे आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, पॅट कमिंस आणि नॅथन लायन हे साउथ वेल्स संघाकडून खेळतात.

रद्द झाला सामना तरी विजेता घोषित

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी केविन रॉबर्टर्स म्हणाले की, 27 मार्च रोजी शेफील्ड शिल्ड स्पर्धेचा अंतिम सामना होणार होता. मात्र ते शक्य नसल्यामुळे न्यू साउथ वेल्सला एकमताने विजयी म्हणून घोषित करण्यात आले. नऊ फेऱ्यांनतर न्यू साउथ वेल्स संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर होता. त्यामुळे त्यांना ही ट्रॉफी देण्यात आली.

6 सामने जिंकत मिळवलं विजेतेपद

अंतिम सामना होऊ न शकल्यामुळे खेळाडू निराश आहेत. मात्र तरी न्यू साउथ वेल्स संघाचे अभिनंदन केले. .क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मेलबर्नमधील मुख्यालय बंद केले असून त्याचे सर्व कर्मचारी घरून काम करत आहेत. न्यू साउथ वेल्सने नऊ सामने खेळले आणि त्यातील सहा जिंकून दोन गमावले, त्यामुळे अंकतालिकेत ते पहिल्या क्रमांकावर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Mar 17, 2020 11:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading