'मला खेळण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही', सचिन झाला भावूक
इन्स्टाग्रामवर सचिनने टेनिस खेळत असलेले जुने फोटो पोस्ट केले आहेत.

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानलं जातं. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होऊनही त्याची लोकप्रियता आजही कायम आहे.

सचिन तेंडुलकर आता सोशल मीडियावर सातत्याने काहीना काही शेअर करत असतो. आताही त्याने जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत.

सचिनला क्रिकेटशिवाय टेनिस खेळायलाही आवडतं. टेनिसच्या कोर्टवरचा बादशहा रॉजर फेडरर आणि क्रिकेटच्या या देवाची मैत्री सर्वांनाच माहिती आहे.

इन्स्टाग्रामवर सचिनने टेनिस खेळत असलेले जुने फोटो पोस्ट केले आहेत. त्याला दिलेल्या कॅप्शनमध्ये सचिनने म्हटलं आहे की, मला खेळण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. जरी माझ्या पायात शूज नसले तरीही नाही.

ऑस्ट्रेलियन ओपनच्या पार्श्वभूमीवर त्याने हे फोटो शेअर केले आहेत. पुढे वाचा...रॉजरचा त्या क्रिकेट शॉटचा सचिन झाला दिवाना, दिला मोलाचा सल्ला

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आता जगज्ज्येत्या टेनिसपटू रॉजरर फेडररला क्रिकेटचे धडे देणार आहेत. स्वतः सचिन टेनिस खेळाचा फार मोठा चाहता आहे.

विंबल्डनच्या चौथ्या फेरीत रॉजर फ्रान्सच्या एड्रियान मेनारिनोविरोधात खेळत होता. या सामन्यात रॉजररने चक्क फॉरवर्ड डिफेन्स शॉट लगावला.

त्याचा हा शॉट पाहून सचिनने ट्विटरवर रॉजरला म्हटले की, तू नववं विंबल्डन जिंकल्यावर क्रिकेटचे धडे घ्यायला सुरूवात कर. आतापर्यंत फेडररने आठ वेळा विंबल्डन स्पर्धा जिंकली आहे

त्याच्या या ट्विटचे उत्तर देताना, फेडरर म्हणाला की, विंबल्डन संपेपर्यंत थांबण्याची काही गरज नाही. मी आतापासूनच शिकायला सुरूवात करु शकतो.

त्यामुळे विंबल्डननंतर जर तुम्हाला सचिन फेडररला क्रिकेट शिकवताना दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
First Published: Jan 24, 2019 06:11 PM IST