• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • ना विराट ना रोहित.. कपिल देव यांच्या मते 'हा' आहे T20 WC चा सर्वात खास खेळाडू

ना विराट ना रोहित.. कपिल देव यांच्या मते 'हा' आहे T20 WC चा सर्वात खास खेळाडू

Kapil Dev

Kapil Dev

टी20 वर्ल्डकपला (ICC T20 World Cup 2021) सुरुवात झाली दरम्यान, अनेक आजी-माजी दिग्गजपटू आपापल्या नजरेतून टीम इंडियाविषयी (Team India) भाष्य करताना दिसत आहेत. अशातच भारताचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी टी20 वर्ल्डकपसंर्भात आपले मत मांडले.

 • Share this:
  नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर: टी20 वर्ल्डकपला (ICC T20 World Cup 2021) सुरुवात झाली दरम्यान, अनेक आजी-माजी दिग्गजपटू आपापल्या नजरेतून टीम इंडियाविषयी (Team India) भाष्य करताना दिसत आहेत. अशातच भारताचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी टी20 वर्ल्डकपसंर्भात आपले मत मांडले आहे. त्यांनी के एल राहूलबाबत प्रबळ विश्वास व्यक्त केला आहे. केएल राहुल, सध्याच्या भारतीय संघातील सर्वात अष्टपैलू फलंदाजांपैकी एक, इंग्लंडविरुद्धच्या टी -20 विश्वचषक सराव सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याने आपले स्थान पक्के केले आहे. आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्मासोबत के. एल. राहुल सलामीला उतरणार असल्याचं भारतीय कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले. विराटच्या या निर्णायाचे समर्थन कपिल देव यांनी केले आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा टी20 वर्ल्डकपमधील पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होण्यापूर्वी कपिल देव यांनी स्पोर्टस्कीडाशी संवाद साधला. दरम्यान ,त्यांना, तुम्हाला कोणसा खेळाडू मैदानात खेळताना बघायला आवडेल असा सवाल करण्यात आला. तेव्हा देव यांनी के एल राहुलच्या नावाचा उल्लेख केला. जो सर्व स्वरूपांमध्ये अपवादात्मक फॉर्ममध्ये आहे. भारताच्या माजी कर्णधाराने विराट कोहली किंवा उपकर्णधार रोहित शर्माचे नाव घ्यावे अशी अनेकांची अपेक्षा होती मात्र तसे झाले नाही. कपिल देव म्हणाले, मला केएल राहुलची बॅटिंग बघायला आवडते. तो खेळत असलेल्या शॉट्सवर त्याचा खूप विश्वास आहे आणि आता सर्व अनुभवांसह टी20 वर्ल्डकपमध्ये तो खूप मोलाच ठरु शकतो. त्याचा खेळ मला नेहमी आवडतो. आणि माझ्या मते तो भविष्यात भारतीय क्रिकेटसाठी खूप चांगल्या गोष्टी करेल. असा प्रबळ विश्वास कपिल देव यांनी यावेळी व्यक्त केला. के. एल. राहुलनं यंदाच्या आयपीएल स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला आहे. ऑरेंज कॅप विजेत्या ऋतुराज गायकवाडपेक्षा राहुलच्या फक्त 9 धवाा कमी आहेत. राहुलनं 13 सामन्यात 626धावांचा पाऊस पाडला आहे. इंग्लंडविरोधात झालेल्या वॉर्मअप सामन्यातही राहुलनं आपला फॉर्म कायम राखला. राहुलनं अवघ्या 24 चेंडूंत झटपट 51धावांची खेळी केली होती.

  वॉर्म-अप सामन्यात भारताची बाजी-

  टीम इंडियाने सोमवारी पहिल्या वार्मअप मॅचमध्ये इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला आणि नंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 9 गडी राखून पराभूत केले. टीम इंडियाची विजयी घोडदौड पाहता क्रिकेट जगतात यंदाच्या टी20 वर्ल्डकपचा प्रबळ दावेदार म्हणून टीम इंडियाकडे पाहिले जात आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published: