मुंबई, 12 डिसेंबर : रोहित शर्माला (Rohit Sharma) भारताच्या वनडे टीमचं कर्णधार करण्यात आलं आहे. पुढच्या महिन्यात भारतीय टीम (Team India) दक्षिण आफ्रिकेत तीन वनडे मॅचची सीरिज (India vs South Africa) खेळणार आहे, तेव्हापासून रोहितच्या खांद्यावर ही जबाबदारी येणार आहे. कर्णधारपदावर नियुक्ती झाल्यानंतर रोहित पहिल्यांदाच बीसीसीआयशी (BCCI) बोलला, यात त्याने अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. लोक काय म्हणतील, याची मी खेळाडू म्हणून कधीच परवा करत नाही, असं रोहित म्हणाला. वनडे सीरिजआधी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. 26 डिसेंबरपासून या सीरिजला सुरुवात होणार आहे.
बीसीसीआय टीव्हीशी बोलताना रोहित म्हणाला, 'भारताकडून खेळताना तुम्ही कायमच दबावात असतात. लोक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही गोष्टी बोलतील, पण माझा फोकस कायमच खेळावर असतो. लोक काय म्हणतात, त्याकडे मी लक्ष देत नाही, कारण या गोष्टी तुम्ही रोखू शकत नाही. सगळ्यात मोठी गोष्ट टीमला जाणून घेणं ही असते. मोठ्या स्पर्धांमध्ये लोक आणखी बोलतात.'
🗣️🗣️ "The pressure will always be there. As a cricketer, it is important to focus on my job." SPECIAL - @ImRo45's first interview after being named #TeamIndia’s white-ball captain coming up on https://t.co/Z3MPyesSeZ. 📽️ Stay tuned for this feature ⌛ pic.twitter.com/CPB0ITOBrv
— BCCI (@BCCI) December 12, 2021
प्रत्येकवेळी जिंकण्याचा प्रयत्न
आम्ही त्याच गोष्टी करतो ज्या आमच्या हातात असतात, जसं की जिंकण्याचा प्रयत्न. आम्ही एकमेकांबाबत काय विचार करतो, हे महत्त्वाचं आहे. खेळाडूंमध्ये चांगलं बॉण्डिंग असणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला लक्ष्य गाठता येईल. राहुल द्रविड कायमच मदत करतो, असं वक्तव्य रोहितने केलं. टी-20 वर्ल्ड कपनंतर रोहितला या फॉरमॅटची कॅप्टन्सी देण्यात आली, त्यानंतर त्याला वनडे टीमचं कॅप्टनही करण्यात आलं.
टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) आपण या फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं विराट कोहलीने (Virat Kohli) आधीच जाहीर केलं होतं, त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजपासून (India vs New Zealand) रोहितला नवी जबाबदारी मिळाली. या सीरिजमध्ये भारताचा 3-0 ने विजय झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rohit sharma, Team india