अश्विनच्या मंकडिंगची वॉर्नरला भीती, पाहा VIDEO

अश्विनच्या मंकडिंगची वॉर्नरला भीती, पाहा VIDEO

राजस्थान रॉयल्सविरुद्ध अश्विनने जोस बटलरला मंकडिंग पद्धतीने बाद केले होते.

  • Share this:

मोहाली, 8 एप्रिल : पंजाबविरुद्धच्या सामन्यात फटकेबाजी करता आली नसली तरी वॉर्नरने संथ गतीने 70 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर हैदराबादने पंजाबसमोर 150 धावांचे आव्हान ठेवले. वॉर्नरने 70 धावांसाठी 62 चेंडू घेतले. यात त्याच्या 6 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

सातव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर अश्विन गोलंदाजीला होता. त्यावेळी विजय शंकर स्ट्राईकला तर वॉर्नर नॉन स्ट्राईकला खेळत होता. तेव्हा अश्विन मंकडिंग पद्धतीने बाद करेल या भीतीने क्रिजसोडून पुढे जाणारा वॉर्नर अचानक मागे वळला. यामुळे पुन्हा एकदा मंकडिंगची चर्चा सुरू झाली.

पंजाबचा कर्णधार आर अश्विनने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात जोस बटलरला नॉन स्ट्रायकर्स एंडला असताना स्टंप्स उडवून बाद केलं होतं.

मंकड आऊट म्हणजे काय?

40च्या दशकात भारताकडून खेळणारा सलामीवीर होता विनू मंकड. विनू मंकड डावखुरा स्लो बोलर म्हणूनही खेळत असे. भारताचा हा अष्टपैलू महान खेळाडू 1947-48 दरम्यान अशाच पद्धतीच्या वादात अडकला होता. त्या वेळी भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विनू मंकडने बिल ब्राऊन या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला वेगळ्याच पद्धतीने आऊट केलं. बिल नॉन स्ट्राईकिंग एंडला असतानाच बोलिंग करत असलेल्या मंकडने अचानक बेल्स उडवल्या. क्रिकेटच्या नियमाप्रमाणे क्रीजमध्ये नसल्याने बिल ब्राऊन आऊट झाला.

वाचा : IPL मध्ये तिसऱ्यांदा स्टंपने केला घोटाळा, फलंदाज बादच होईना, पाहा VIDEO

यावरून ऑस्ट्रेलियाच्या संघाने थैमान घातलं. ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांनीही भारतीय गोलंदाज कसा चुकीचं वागला याबद्दल लिहून विनू मंकड यांच्याविरोधात रान उठवलं. आजही हे यापद्धतीनं धावबाद करणं खेळाच्या उस्फूर्त भावनेच्या विरोधात असल्याचं मानलं जातं. अशा पद्धतीने आऊट झालं की मंकड डिसमिसल असं म्हटलं जात. मंकडिंग असं क्रियापदच क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये रूढ झालं आहे.

VIDEO : अजितदादांना आवडलं राज ठाकरेंचं भाषण, विनोद तावडेंचा केला 'पोपट'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 10:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading