मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /विराटसेनेला दमवणारा 'तो' खेळाडू किवींच्या ताफ्यातून 'आऊट' Team India ला बदला घेण्याची मोठी संधी

विराटसेनेला दमवणारा 'तो' खेळाडू किवींच्या ताफ्यातून 'आऊट' Team India ला बदला घेण्याची मोठी संधी

ind vs nz test series

ind vs nz test series

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (NZC) टीम इंडियाविरुद्धच्या टेस्ट सिरीजसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर: न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (NZC) टीम इंडियाविरुद्धच्या टेस्ट सिरीजसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. विशेष, म्हणजे न्यूझीलंडच्या संघनिवडीमुळे टीम इंडियाला (Team India) मोठा दिलासा मिळाला आहे. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला (Trent Boult)संघात स्थान मिळालेले नाही. याशिवाय कॉलिन डी ग्रँडहोमही (Colin De Grandhomme) बाहेर आहे. दोन्ही खेळाडू बर्‍याच काळापासून बायो बबलमध्ये आहेत. त्यामुळे ते सिरीज खेळू शकणार नाहित.

25 नोव्हेंबरपासून 2 सामन्यांची टेस्ट सिरीज सुरू होत आहे. ही सिरीज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा भाग आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची मोठी संधी मिळाली आहे.

बोल्टने टी20 वर्ल्ड कप (T2o World Cup 2021) मध्ये कमीलीची कामगिरी करत टीम इंडियाच्या खेळाडूंना गुडघे टेकायला लावले होते. आपल्या स्फोटक गोलंदाजीने 3 बळी टिपले होते. कानपूर येथे पहिल्या सिरीजला सुरुवात होणार आहे. दुसरी सिरीज ३ डिसेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. भारताची ही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील दुसरी मालिका आहे.

कानपूर व मुंबईत होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी किवींनी पाच फिरकीपटूंचा समावेश केला आहे. त्यात अजाज पटेल, मिचेल सँटनर आणि विल समरविल हे प्रमुख फिरकीपटू असतील, त्यांना बॅकअप म्हणून रचिन रविंद्र आहेच. शिवाय स्फोटक यष्टिरक्षक-फलंदाज ग्लेन फिलिप्सही संघात आहे. जलदगती गोलंदाजाची जबाबदारी टीम साऊदी, कायले जेमिन्सन आणि निल वॅगनर यांच्यावर असेल.

असा आहे न्यूझीलंडचा संघ

केन विलियम्सन, टॉम ब्लंडल, डेव्हान कॉनवे, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र, मिचेल सँटनर, विल समरविल, टीम साऊदी, रॉस टेलर, विल यंग, निल वॅगनर

First published:
top videos

    Tags: Cricket, Cricket news, New zealand, Team india