India vs West Indies : टीम इंडियाला धोका असल्याची पाकिस्तानमध्ये चर्चा, BCCIने केला खुलासा!

India vs West Indies : टीम इंडियाला धोका असल्याची पाकिस्तानमध्ये चर्चा, BCCIने केला खुलासा!

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आला निनावी मेल, भारतीय संघाला संपवण्याची धमकी.

  • Share this:

त्रिनीदाद, 19 ऑगस्ट : भारतीय क्रिकेट बोर्डाला रविवारी टीमला वेस्ट इंडिजमध्ये धोका असल्याची माहिती मिळाली होती. बीसीसीआयला ई-मेल पाठवण्यात आला होती की, भारतीय संघातील खेळाडूंच्या जिवाला धोका आहे. यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाची सुरक्षा वाढवण्यात आली. मात्र, बीसीसीआयनं ही बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे. तरीही एंटीगुआ सरकारनं दोन्ही संघाच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी संध्याकाळी पीटीआयला, “आम्ही सुरेक्षसंदर्भात चर्चा केली आहे. दरम्यान मिळालेला ई-मेल हा खोटा होता”, असे सांगितले. दरम्यान बीसीसीआय भारतीय संघाच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाय योजना करत आहेत.

भारतीय उच्च अधिकाऱ्यांनी दिली माहिती

अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत, “आम्ही यासंर्दभात माहिती एंटीगुआमध्ये असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यांनी सरकारला यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळं दोन्ही संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच आयटी सेल ई-मेल कोणी पाठवला याबाबत शोध घेत आहेत”, असे सांगितले.

वाचा-भारताच्या रनमशीननं मोडला सचिनचा आणखी एक ‘विराट’ रेकॉर्ड!

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे आला होता ईमेल

पाकिस्तानी न्यूज चॅनल जिओ टीव्हीनं दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाला संपवण्याची धमकी देणारा ई-मेल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे आला होता. पीसीबीनं आयसीसीला याबाबत माहिती देत बीसीसीआयला खेळाडूंची सुरक्षा वाढवण्यास सांगण्यात आले आहे. गृह मंत्रालयालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.

वाचा-कसोटी क्रिकेटचा रणसंग्राम! 'हे' 5 संघ आहेत ICC टेस्ट चॅम्पियनशीपचे प्रबळ दावेदार

खेळाडूंनाही देण्यात आली माहिती

मीडिया रिपोर्टनुसार भारतीय संघाचे मॅनेजर सुनील सुब्रमण्‍यम यांनी खेळाडूंना याबाबत माहिती दिली आगे. तसेच, खेळाडूंना फिरण्यासाठी बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. निनावी मेलनंतर संघ व्यवस्थापनाने संघासोबत विशेष बैठक घेतली.

वाचा-ना कोच, ना निवड समितीचा अध्यक्ष; 'ही' आहे सौरव गांगुलीची सेकंड इनिंग!

एंटीगामध्ये आहे टीम इंडिया

वर्ल्ड कपमध्ये मिळालेल्या पराभवानंतर टीम इंडियात तीन टी-20, दोन एकदिवसीय आणि 2 कसोटी सामन्यांसाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. दरम्यान भारतीय संघानं टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला आहे. 22 ऑगस्टपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

वाचा-श्रीलंकेचा संघ पाकमध्ये खेळून पुन्हा स्वत:चा जीव टाकणार धोक्यात?

VIDEO: मुसळधार पावसामुळे कुल्लूजवळ दरड कोसळली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 09:02 AM IST

ताज्या बातम्या