संघात विराटची हूकूमशाही? कर्णधारपदावरून हटवण्याच्या प्रश्नावर RCB ने दिलं उत्तर

आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला एकदाही विजेतेपद पटकावता आलेलं नाही. संघाने त्यांच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 20, 2019 10:29 AM IST

संघात विराटची हूकूमशाही? कर्णधारपदावरून हटवण्याच्या प्रश्नावर RCB ने दिलं उत्तर

बेंगळुरू, 20 सप्टेंबर : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजीत एकापाठोपाठ एक विक्रम मोडत वाटचाल सुरू आहे. त्याशिवाय नेतृत्व करतानाही विराट भारताचा यशस्वी कर्णधार ठरला आहे. विंडीज दौऱ्यावर भारताने तिनही प्रकारात मालिका विजय साजरा केला. भारतीय संघाचे नेतृत्व करताना ऐतिहासिक कामगिरी नोंदवणाऱ्या विराटला आयपीएलमध्ये मात्र यश मिळालेलं नाही. आतापर्यंत त्याच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला एकदाही विजेतेपद पटकावता आलेलं नाही. गेल्या हंगामात त्याच्या संघाला गुणतक्त्यात शेवटच्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं.

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने त्यांच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल केला आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाजी सायमन कॅटिच यांच्याकडे प्रशिक्षकपदाची धुरा सोपवली असून संघ संचालक म्हणून न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माइक हेसन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेंगळुरूत झालेल्या पत्रकार परिषदेत कॅटिच आणि माइक हेसन यांनी संघाबद्दल विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरे दिली.

गेल्या तीन हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला प्ले ऑफमध्येही स्थान मिळवता आलेलं नाही. त्यामुळं विराटऐवजी दुसऱ्या कोणाच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सायमन कॅटिच यांनी म्हटलं की, असं अजिबात नाही. पुढच्या हंगामात विराटच्या नेतृत्वाखालीच बेंगळुरू आयपीएल जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माइक हेसन म्हणाले की, विराट कोहलीने मागच्या चुकांमधून धडा घेतला असेल अशी आशा आहे. विराटच्या नेतृत्वाबद्दल कोणतीही शंका नाही.

वाचा : IPL: मुंबई इंडियन्सची बल्ले बल्ले; विराटच्या संघाला मोठा झटका!

संघात विराट कोहली सर्व निर्णय घेतो का? असा प्रश्न विचारला गेला. तेव्हा सायमन कॅटिच म्हणाले की, विराट सर्वांना नियंत्रणात ठेवतो असं नाही. तो संघाला पुढं नेण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतो. एखाद्या मतावर दुमत असू शकतं पण संघासाठी काय बरोबर आहे हे तो पाहतो.

Loading...

वाचा : 'धोनीची वेळ संपली, हकालपट्टीपूर्वी निवृत्तीचा सामना खेळवा'

CCTV VIDEO: मी बिल का देऊ म्हणत तरुणाची हॉटेल मालकाला बेदम मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 10:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...