World Cup : आयपीएलच्या 'या' संघातील एकही खेळाडू वर्ल्ड कप खेळणार नाही

World Cup : आयपीएलच्या 'या' संघातील एकही खेळाडू वर्ल्ड कप खेळणार नाही

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या एकूण 15 खेळाडूंची वर्णी लागली असून यात रिषभ पंत आणि मुंबईकर अजिंक्य रहाणेला डच्चू देण्यात आला आहे.दरम्यान वर्ल्ड कप संघाच्या निवडीमध्ये आयपीएलची खेळी ग्राह्य धरली जाणार नाही, अशी घोषणा याआधीच निवड समितीनं केली होती. तरीही यंदाच्या बाराव्या हंगमात खेळणारे तब्बल सात खेळाडू पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळतील. यात आयपीएलमधून महेद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज या संघातील तीन खेळाडूंची वर्णी लागली आहे. धोनी वगळता रविंद्र जडेजा आणि केदार जाधव इंग्लंडमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतील.

तर, रोहित शर्माच्या मुंबई संघाकडून रोहित शर्मा शिवाय हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांना संघात स्थान मिळाले आहे. तर, बंगळुरू संघाकडून कर्णधार विराट कोहली आणि युजवेंद्र चहल वर्ल्ड कप खेळतील. तर, पंजाब संघाकडून केएल राहुल, दिल्ली संघाकडून शिखर धवन, कोलकाता संघाकडून दिनेश कार्तिक आणि कुलदीप यादव यांची वर्णी लागली आहे. हैदराबाद संघाकडूनही भुवनेश्वर कुमार आणि विजय शंकर खेळतील. मात्र या 15 खेळाडूंच्या यादीत एका आयपीएल संघातील एकाही खेळाडूचा समावेश नाही आहे.

आयपीएलमध्ये खेळणारा राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याचं नाव वर्ल्ड कपसाठी चर्चेत होते, मात्र त्याची संघात निवड करण्यात आलेली नाही. रहाणे वगळता इतर कोणत्याही खेळाडूला संघात स्थान मिळालेले नाही.

2019 च्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक.


VIDEO: खूशखबर! मान्सूनबाबत हवामान विभागानं काय वर्तवला अंदाज?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 05:45 PM IST

ताज्या बातम्या