दुबई, 12 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियानं गुरुवारी झालेल्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये (Australia vs Pakistan Semi Final) पाकिस्तानचा 5 विकेट्सनं पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. पाकिस्तानने या स्पर्धेमधील इतर सामन्यांप्रमाणेच ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज दिली. मात्र, फायनलमध्ये पोहचण्याचे स्वप्न भंग झाले. झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममधील एक व्हि़डीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) संघातील आपल्या सहकारी खेळाडूंना सावरताना दिसत आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. आझम ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरही निराशा होती. मात्र त्याने खेळाडूंना प्रोत्साहन दिले. “दु:ख आपल्या सर्वांचे आहे, आपण काय चूक केली, कुठे चुकलो, कोणीही एकमेकांना सांगणार नाही, कारण सर्वांनाच हे माहीत आहे. त्याने खेळाडूंना सांगितले की, कोणीही कोणाला सांगणार नाही, की आपण त्याच्या चुकीमुळे हरलो. एक संघ म्हणून आपली एकता कायम ठेवायची आहे. संपूर्ण संघ खराब खेळला. म्हणूनच कोणीही कोणाकडे बोट दाखवणार नाही.” अशी भावनिक सूचना आझमने संघाला दिली आहे.
Babar Azam, Saqlain Mushtaq and Matthew Hayden are proud of their side despite a five-wicket defeat in #T20WorldCup semi-final. pic.twitter.com/kAem5PrWjj
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 11, 2021
होय, आपण हरलो आहोत. पण हरकत नाही. या पराभवातून धडा घेऊ आणि आगामी मालिका आणि स्पर्धांमध्ये येथे झालेल्या चुकांची पुनरावृत्ती आपण करायची नाही. प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपण जी जोडणी केली आहे, ती तुटू नये. एका पराभवाने आमचा संघ तुटू नये. आपण सर्वांनी आपली भूमिका बजावली आहे, एक कुटुंबासारखे वातावरण तयार केले आहे. एका पराभवामुळे ते धोक्यात येऊ नये. निकाल आपल्या हातात नसतो, पण सातत्यपूर्ण कामगिरी केली, तर आपोआप निकाल येऊ लागतील.
तसेच, आझमने खेळाडूंना इशारा दिला, पराभवाचा दोष कोणीही एका खेळाडूवर टाकणार नाही आणि मी कोणी असे करताना पाहिले आणि ऐकले तर चांगले होणार नाही. मी त्याच्या विरोधात कसा जाईन हे सांगायची गरज नाही. पराभवानंतर आझमने दाखवलेल्या या समजूतदारीचे कौतुक सर्व स्तरावर होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Babar azam, Pakisatan, Pakistan Cricket Board