मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : विराट-शास्त्रींना टीममध्ये असुरक्षितता निर्माण करण्याची गरज नाही!

IND vs ENG : विराट-शास्त्रींना टीममध्ये असुरक्षितता निर्माण करण्याची गरज नाही!

टीम इंडियाच ओपनर शुभमन गिल (Shubhaman Gill) याच्या दुखापतीने टीम इंडियाला धक्का बसला आहे. पायाच्या दुखापतीमुळे गिल इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) संपूर्ण सीरिजमधून बाहेर झाला आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 8 जुलै : टीम इंडियाच ओपनर शुभमन गिल (Shubhaman Gill) याच्या दुखापतीने टीम इंडियाला धक्का बसला आहे. पायाच्या दुखापतीमुळे गिल इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) संपूर्ण सीरिजमधून बाहेर झाला आहे, त्यामुळे आता कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना नवा ओपनर म्हणून कोणाला संधी द्यायची, यासाठी मंथन करावं लागणार आहे. टीम इंडियाकडे ओपनर म्हणून आता केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) हे दोन पर्याय उपलब्ध आहेत, शिवाय स्टॅण्डबाय खेळाडू म्हणून अभिमन्यू इश्वरन (Abhimanyu Ishwaran) आहे. तरीही विराट आणि शास्त्रींना टीममध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) हवे होते, असं वृत्त प्रसिद्ध झालं.

टीम इंडियाने आधीच शॉ आणि पडिक्कलला इंग्लंड दौऱ्यासाठी का घेतलं नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू साबा करीम (Saba Karim) यांनीही हाच मुद्दा मांडला आहे. अशाप्रकारच्या चर्चा खेळाडूंमध्ये असुरक्षितपणा निर्माण करतात, असं मत साबा करीम यांनी मांडलं.

'मला हे पटत नाही. जर तुम्ही एक अतिरिक्त खेळाडू पाठवत असाल, तर टीममध्ये असलेल्या सध्याच्या खेळाडूंना असुरक्षित वाटेल. अशी असुरक्षितता निर्माण करण्याची काहीही गरज नाही,' अशी प्रतिक्रिया साबा करीम यांनी इंडिया न्यूजशी बोलताना दिली.

'तुम्हाला निवड समितीने दिलेल्या कामावर विश्वास ठेवावा लागेल. टीमकडून अशाप्रकारची मागणी आली असेल, यावर माझा अजूनही विश्वास नाही, पण जर अशी मागणी केली गेली असेल, तर हे योग्य नाही. जर टीमला एखाद्या अतिरिक्त खेळाडूची गरज होती, तर त्यांनी निवड समितीसोबत चर्चा करणं गरजेचं होतं. खासकरून अध्यक्षांसबोत, पण कोणता खेळाडू तिकडे जाईल, हे निवड समिती ठरवते,' असं साबा करीम म्हणाले.

'तुमच्याकडे एवढे सगळे ओपनर असताना तुम्हाला आणखी बॅट्समनची गरज का आहे? हे इकडे बसून सांगणं कठीण आहे. कदाचित ऑस्ट्रेलियात जी परिस्थिती निर्माण झाली ते पाहून त्यांनी अशी मागणी केली असेल. म्हणून कदाचित त्यांनी अतिरिक्त ओपनर मागितला असेल, कारण शुभमन गिल परतला आहे आणि सीरिज जास्त काळ चालणार आहे. पाच टेस्ट मॅच खेळवल्या जाणार आहेत, एखाद्या खेळाडूला मध्येच दुखापत झाली तर नवा खेळाडू क्वारंटाईनमुळे खेळू शकणार नाही,' असं वक्तव्य साबा करीम यांनी केलं.

First published:

Tags: Cricket, India vs england, Team india, Virat kohli