या दोन खेळाडूंसाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद! BCCI नेही केला नाही करार

या दोन खेळाडूंसाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद! BCCI नेही केला नाही करार

बीसीसीआयने (BCCI) गुरूवारी भारतीय क्रिकेटपटूंसोबतच्या (Team India) कराराची घोषणा केली. बीसीसीआयने या मोसमासाठी एकूण 28 खेळाडूंना करारबद्ध केलं आहे. या करारामधून केदार जाधव (Kedar Jadhav) आणि मनिष पांडे (Manish Pandey) यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 16 एप्रिल: बीसीसीआयने (BCCI) गुरूवारी भारतीय क्रिकेटपटूंसोबतच्या (Team India) कराराची घोषणा केली. बीसीसीआयने या मोसमासाठी एकूण 28 खेळाडूंना करारबद्ध केलं आहे. या खेळाडूंची 4 ग्रेडमध्ये विभागणी करण्यात आली आहे. A प्लस ग्रेडमधील खेळाडूंना 7 कोटी रुपये, A ग्रेडमधील खेळाडूंना 5 कोटी रुपये, ग्रेड B मधील खेळाडूंना 3 कोटी, तर C ग्रेडमधील खेळाडूंना वर्षभरासाठी प्रत्येकी 1 कोटी रुपये मानधन मिळणार आहे.

मागच्यावेळप्रमाणेच यंदाही A प्लस ग्रेडमध्ये विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या तीन खेळाडूंचाच समावेश आहे. तर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांचं डिमोशन झालं आहे.

बीसीसीआयच्या या करारामधून केदार जाधव (Kedar Jadhav) आणि मनिष पांडे (Manish Pandey) यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, त्यामुळे या दोन्ही खेळाडूंसाठी टीम इंडियाची दारं कायमची बंद झाली आहेत का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

मनिष पांडे मागच्या मोसमात टीम इंडियासोबत होता, पण त्याला खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही. आयपीएलच्या (IPL 2021) सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्येही मनिष पांडेने निराशाजनक कामगिरी केली आहे. कोलकात्याविरुद्धच्या (KKR) सामन्यात मनिष पांडेने 44 बॉलमध्ये नाबाद 61 रनची खेळी केली, पण तरीही हैदराबादला (SRH) सामना जिंकता आला नाही. तर बँगलोरविरुद्ध (RCB) मनिष पांडेने 39 बॉलमध्ये 38 रन केले. या दोन्ही सामन्यांमध्ये एवढे बॉल खेळल्यानंतरही टीमला जिंकवता न आल्यामुळे मनिष पांडेवर टीकाही झाली.

दुसरीकडे केदार जाधव न्यूझीलंडविरुद्ध 2020 साली खेळलेल्या वनडेनंतर टीममध्ये दिसला नाही. केदार जाधवचं वय आणि त्याचा फॉर्म बघता आता त्याचंही टीम इंडियामध्ये पुनरागमन होणं जवळपास अशक्यच वाटत आहे.

BCCI नं हार्दिक पांड्याच्या पगारात केली 2 कोटींची वाढ, वाचा रोहित आणि विराटला किती मिळणार पैसे?

बीसीसीआयचा नियम काय?

बीसीसीआयच्या नियमानुसार एखाद्या खेळाडूला करारबद्ध करण्यासाठी त्याने मागच्या मोसमात कमीत कमी 3 टेस्ट किंवा 8 वनडे किंवा 10 टी-20 खेळणं बंधनकारक आहे. केदार जाधव आणि मनिष पांडे बीसीसीआयच्या या नियमांमध्ये बसत नसल्यामुळे या दोघांचाही करारात समावेश करण्यात आला नाही. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि टी. नटराजन (T Natrajan) हेदेखील या नियमात बसत नसल्यामुळे त्यांनाही करारामधून डावलण्यात आलं.

Published by: Shreyas
First published: April 16, 2021, 4:54 PM IST

ताज्या बातम्या