आयपीएलची सर्वात मोठी कॉन्ट्रोव्हर्सी

आयपीएलची सर्वात मोठी कॉन्ट्रोव्हर्सी

पंचांनी तो नो- बॉल दिला असता तर आजच्या सामन्याचा निर्णय वेगळा असला असता.

  • Share this:

बंगळुरू, 28 मार्च- मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरुचा सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. लसिथ मलिंगाच्या शेवटच्या षटकात बंगळुरूला सहा चेंडूत सामना जिंकण्यासाठी १७ धावांची गरज होती. काही क्षणासाठी मुंबईच्या हातून हा सामना गेला असं वाटत होता. अगदी शेवटच्या चेंडूत बंगळुरूला सात धावांची गरज होती. मलिंगाचा शेवटचा चेंडू नो- बॉल होता. मात्र पंचांचे त्याकडे लक्ष न गेल्याने सामना मुंबई इंडियन्सने जिंकला असं घोषित करण्यात आले. पंचांनी तो नो- बॉल दिला असता तर आजच्या सामन्याचा निर्णय वेगळा असला असता.

सामना संपल्यानंतर मलिंगाने शेवटचा चेंडू नो- बॉल टाकल्याचे स्पष्ट झाले होते. पण पंचांचा निर्णय अंतिम असल्यामुळे मुंबई इंडियन्सला विजेता घोषित करण्यात आले. यानंतर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने आपला राग व्यक्त करत म्हटले की, ‘आयपीएलमध्ये प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असतो हे माहीत असताना पंचांनी मैदानात त्यांचे डोळे उघडे ठेवून उभं राहिलं पाहिजे. दुसऱ्यांच्या चुकीचा फटका आम्हाला बसला.’

रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा पराभव केला आहे. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने 6 धावांनी विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इडियन्सने 187 धावा केल्या होत्या. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने 48 धावांची खेळी केली तर शेवटी अष्टपैलू हार्दिक पांड्याने जोरदार फटकेबाजी करत 32 धावा केल्या.

मुंबईने दिलेल्या 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूच्या टीमनेही जोरदार लढत दिली. परंतु त्यांना मुंबईने दिलेल्या आव्हान गाठणं शक्य झालं नाही. बंगळुरूचा डाव 20 षटकांत पाच बाद 181 धावांवर आटोपला. अखेर मुंबईने 6 धावांनी विजय मिळवला.

SPECIAL REPORT : पार्थ पवारांचा मावळ जिंकण्याचा मनसुबा, काँग्रेसची नाराजी महागात पडणार?

First published: March 29, 2019, 12:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading