IPL 2019 : पार्थिवला आऊट करण्यासाठी नितीश राणानं केली अशी कसरत, पाहा व्हिडिओ

मिस्टर 360 या नावानं ओळखला जाणारा एबी डीव्हिलियर्स या सामन्यात खेळणार नाही आहे. त्यामुळं याचा फटका विराटला नक्कीच बसेल.

News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 09:08 PM IST

IPL 2019 : पार्थिवला आऊट करण्यासाठी नितीश राणानं केली अशी कसरत, पाहा व्हिडिओ

कोलकाता, 19 एप्रिल : आठ पैकी सात सामने हरल्यानंतर आयपीएलमधलं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. तरी कोलकाता विरुद्धचा सामना त्यांच्यासाठी करो वा मरोचा सामना असणार आहे. दरम्यान या सामन्यात मिस्टर 360 या नावानं ओळखला जाणारा एबी डीव्हिलियर्स दुखापतीमुळं सामना खेळणार नाही आहे.

कोलकाता विरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिकनं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरूकडून सलामीला आलेल्या पार्थिव पटेल आणि विराट कोहली यांना चांगली सुरुवात करण्यात आली नाही. दरम्यान पार्थिव पटले 11 धावांवर बाद झाला. सुनील नारायणच्या फिरकीनं पार्थिन पटेलला चकमा दिला आणि RCBला 18 धावांवर पहिला फटका बसला. आरसीबीच्या विरोधात सुनील नारायणचीही 16वी विकेट होती.


Loading...


मात्र पार्थिवच्या विकेटसाठी नितीश राणाला चांगलीच कसरत करावी लागली. सुनील नरीनच्या गोलंदाजीवर नितीश राणानं पार्थिवचा झेल टिपला खरा, पण त्यानं तीन वेळा हातातून निसटत असलेला झेल पकडला.सध्या विराट कोहली आणि मोईन अली यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी आहे. दरम्यान, आरसीबीला उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहे. एवढंच नाही तर त्यांना हा विजय मोठ्या फरकाने मिळवावा लागेल. त्याशिवाय इतर संघांच्या कामगिरीवर त्यांचा प्लेऑफचा प्रवेश होणार की नाही ते ठरणार आहे. प्ले ऑफसाठी केकेआरला सहापैकी किमान चार सामने जिंकणे गरजेचे आहे. त्यापैकी तीन सामने ईडन गार्डनवर खेळले जातील.


VIDEO : बारामतीच्या सभेत अमित शहांनी मागितला पवारांकडे हिशेब, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 09:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...