मुंबई इंडियन्सला जिंकू दे, नीता अंबानी साईंच्या चरणी

यावेळी नीता अंबानी यांनी मुंबई इंडियन्स संघाची जर्सी घालूनच साईंना प्रार्थना केली.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 28, 2018 10:41 PM IST

मुंबई इंडियन्सला जिंकू दे, नीता अंबानी साईंच्या चरणी

28 एप्रिल : आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या पराभवाची मालिका सुरूच असूनआज संघाच्या मालकीण नीता अंबानी यांनी शिर्डीत साईंच्या चरणी हजेरी लावलीये.

आज संध्याकाळी नीता अंबानी शिर्डीत आल्या असून संध्याकाळच्या धुपारतीला हजेरी लावली असून आज मुंबई संघाचा सामना चेन्नईशी असून रात्रीची शेजारती सुद्धा नीता अंबानी करणार आहे. यावेळी नीता अंबानी यांनी मुंबई इंडियन्स संघाची जर्सी घालूनच साईंना प्रार्थना केली. तसंच साईच्या समाधीला ही संघाच्या निळ्या रंगात सजवत नीता अंबानी यांनी निळ्या रंगाची चादर साई समाधीवर अर्पण केलीय.

मागील वर्षीच्या विजेत्या मुंबई इंडियन्स संघाला यावर्षी सूर गवसला नसून पराभवाची मालिका खंडित व्हावी असं साकडंच नीता अंबानी यांनी साईना घातलंय. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मी प्रार्थना करायला आले असल्याचं सांगितलं.

दरम्यान, मागील वर्षी सुद्धा आयपीएल स्पर्धेदरम्यान नीता अंबानी संघ पात्र झाल्यावर त्यांनी तीन वेळा साईच्या दरबारी हजेरी लावून दर्शन घेतले होते. यावेळीही सततच्या सुरू असलेल्या संघाच्या पराभव मालिकेला खंडित करण्यासाठी साईंच्या दरबारी हजेरी लावली असून धुपारती आणि शेजारती या दोन आरत्यांना हजेरी लावलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2018 10:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...