• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • निशा दहिया प्रकरणात नवा ट्वीस्ट, VIDEO शेयर करत म्हणाली 'मी जिवंत आहे'

निशा दहिया प्रकरणात नवा ट्वीस्ट, VIDEO शेयर करत म्हणाली 'मी जिवंत आहे'

राष्ट्रीय कुस्तीपटू निशा दहिया (Wrestler Nisha Dahiya) प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. निशा दहियावर गोळीबार झाला असून यात तिचा आणि तिच्या भावाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती, पण हे वृत्त खोटं असल्याचं स्वत: निशानेच व्हिडिओ शेयर करत सांगितलं आहे.

 • Share this:
  सोनिपत, 10 नोव्हेंबर : राष्ट्रीय कुस्तीपटू निशा दहिया (Wrestler Nisha Dahiya) प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. निशा दहियावर गोळीबार झाला असून यात तिचा आणि तिच्या भावाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती, पण हे वृत्त खोटं असल्याचं स्वत: निशानेच व्हिडिओ शेयर करत सांगितलं आहे. मी सध्या गोंडामध्ये सिनियर नॅशनल खेळण्यासाठी आले आहे. मी व्यवस्थित असून माझ्या मृत्यूच्या बातम्या चुकीच्या आहेत, असं निशा दहिया या व्हिडिओमध्ये म्हणाली आहे. निशा दहियाचा हा व्हिडिओ रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने प्रसिद्ध केला आहे. याशिवाय कुस्तीपटू साक्षी मलिकनेही ट्वीट करत निशा दहियाला काहीही झालं नसल्याचं सांगितलं आहे. काय आहे प्रकरण? हरियाणातल्या सोनीपतमधल्या हलालपूर गावात निशा दहिया आणि तिच्या कुटुंबावर हल्ला झाल्याचं वृत्त होतं, या गोळीबारामध्ये निशा आणि तिच्या भावाचा मृत्यू झाला तर आईची प्रकृती गंभीर आहे, असं सांगण्यात आलं होतं. पण आता खुद्द निशाच समोर आल्यामुळे हे वृत्त चुकीचं असल्याचं निष्पन्न झालं आहे.
  Published by:Shreyas
  First published: