IPL 2019 : शाहरुखच्या संघाने दिली कोकणातल्या 'या' खेळाडूला संधी

सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 स्पर्धा गाजवल्यानंतर या खेळाडूनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राकडून पर्दापण केले.

News18 Lokmat | Updated On: Mar 30, 2019 09:30 PM IST

IPL 2019 : शाहरुखच्या संघाने दिली कोकणातल्या 'या' खेळाडूला संधी

नवी दिल्ली, 30 मार्च : आयपीएल म्हणजे खऱ्या अर्थानं नव्या खेळाडूंसाठी हक्काची जागा. गेल्या 11 हंगामात IPLनं अनेक नवख्या खेळाडूंना थेट भारतीय संघातही स्थान दिले. अश्याच एका भारतीय आंद्रे रसेलनं कोलकताकडून सलामीचे स्थान पटकावले. हा खेळाडू आहे, निखिल नाईक. निखिलला पाहिल्यानंतर तुम्हाला अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादची आठवण येईल. आज दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात निखिल थेट सलामीला उतरला. त्यामुळं कोकणवासियांची मान अभिमानानं उंचावली. कारण यापूर्वी हे नाव फारसं कुणाला माहिती नव्हतं.कोलकताकरिता खेळण्याआधी निखिल 2016 साली पंजाबकडून खेळत होता. पंजाबकडून खेळताना निखिलनं केवळ 27 धावा केल्या होत्या. यंदाच्या आयपीएलच्या लिलावात 20 लाखांच्या बेस प्राईजवर निखिलला शाहरुखच्या संघानं विकत घेतले. निखील हा मुळचा सावंतवाडीचा आहे. त्यानं आपल्या क्रिकेटची सुरूवात सावंतवाडीतूनच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. स्थानिक सामन्यांमध्ये दमदार फलंदाजी केल्यानंतर निखिलची वर्णी थेट महाराष्ट्राच्या संघात लागली. सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 स्पर्धेत निखिलनं 58 चेंडूत 95 धावा केल्या. निखिल फलंदाजीबरोबर यष्टीरक्षणामध्येही निष्णात आहेत.

2014 साली निखिलनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये पर्दापण केले, यात चार सामन्यात त्यानं 234 धावा केल्या होत्या. यष्टीरक्षण करतानाही निखिलने चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या नावावर 19 झेल आणि 4 स्टम्पिंग्स आहेत. यामुळं त्याची वर्णी आयपीएलमध्ये लागली.

आज कोलकताकडून खेळताना दिल्लीविरुद्धच्या सामन्यात निखिलला चांगली कामगिरी करता आली नाही. ख्रिस लिनबरोबर सलामीला उतरलेल्या निखिलनं केवळ 7 धावा केल्या. यामध्ये एका चौकाराचा समावेश होता. त्यामुळं पुढच्या सामन्यात त्याला संघात जागा मिळेल की नाही, याबाबत साशंकता असली तरी नाईकांच्या या निखिलनं कोकणवासियांची मान उंचावली.


POINTS TABLE:SCHEDULE TIME TABLE:ORANGE CAP:PURPLE CAP:RESULTS TABLE:VIDEO: 'आपला पंतप्रधान कोण?' उद्धव ठाकरे म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Mar 30, 2019 09:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...