• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 170 रुपयांत केला केरळ ते काश्मीर प्रवास; पाहा 23 वर्षांच्या तरुणाची अजब सहल

170 रुपयांत केला केरळ ते काश्मीर प्रवास; पाहा 23 वर्षांच्या तरुणाची अजब सहल

निधिनला 5647 किलोमीटर्सच्या या प्रवासात अनेक चांगली माणसं भेटली. पैशाची श्रीमंती नसली, तरी तोअनुभवाने मात्र खूप समृद्ध झाला.

 • Share this:
  मुंबई 21 मे: आपल्या मनासारखं जगता येण्यासारखं सुख नाही,असं म्हणतातपण मनासारखं जगण्याची किंमत दर वेळी आपल्याला परवडण्यासारखी असतेच असं नाहीपण तीव्र इच्छा असेलतर ती प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने काही तरी मार्ग सापडतोच. केरळच्या (Kerala)थ्रिसूर जिल्ह्यातल्या अंबालूर गावातल्या 23 वर्षांच्या निधिन मालियेक्कलच्या (Nidhin Maliyekkal)बाबतीत तसंच झालं. घरच्या अत्यंत गरीब परिस्थितीमुळे रस्त्याकडेला बालपण गेलेल्या निधिनने आपली प्रवासाची आवड पूर्ण करण्यासाठी केरळ ते काश्मीर हा प्रवास केला आणि तोही चक्क सायकलवरून. या प्रवासासाठी त्याच्याकडे होते फक्त 170 रुपयेपण आपल्या या सहलीचा खर्च त्याने भागवला तो प्रवासादरम्यान चहा विकून (Selling Tea).एके काळी समाजाकडून अव्हेरलं गेलेल्या निधिनला 5647 किलोमीटर्सच्या या प्रवासात अनेक चांगली माणसं भेटली. पैशाची श्रीमंती नसलीतरी तोअनुभवाने मात्र खूप समृद्ध झाला. 'द हिंदू'ने त्याच्या या आगळ्या वेगळ्या प्रवासाची रोचक कहाणी प्रसिद्ध केली आहे. निधिनला 12 वी झाल्यानंतर प्रवासाचं वेड लागलं. त्याने एर्नाकुलम जिल्ह्यात ऑटोमोबाइलइंजिनीअरिंगला प्रवेश घेतला. रेल्वेने दोन तास प्रवास करून तो कॉलेजला जाई.दरम्यानच्या काळात त्याने कॉलेजला जाणं सोडून अनेक ठिकाणी भटकायला सुरुवातकेली. कॉलेजमध्ये हे कळल्यावर मात्र त्याचा प्रवास आणि शिक्षण दोन्हीथांबलं.2019मध्ये तो दक्षिण भारतात अनेक ठिकाणी फिरला;पण नंतरत्याच्याकडे पैसे नसल्याने त्याचं फिरणं थांबलं. एका ठिकाणी चहा आणि ज्यूसतयार करण्याचं काम त्याला मिळालं. पण लॉकडाउनमुळे ती नोकरी गेली.10महिनेतसेच गेल्यावर शेवटी वेगळं काही तरी करायचं म्हणून त्याने ही ट्रिप ठरवली. लहानभावाची हर्क्युलस सायकल घेऊन त्याने जायचं ठरवलं. सायकल (Bicycle)दुरुस्तीसाठी आणि प्रवासाला आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी त्याने आपलाकॅमेरा विकला. एक तंबू,रॉकेल,रॉकेलचा स्टोव्ह,चहाचं सामान,चार शर्ट,दोन शॉर्ट्स आणि170रुपये एवढ्या पुंजीसह तो बाहेर पडला. त्याच्याकडेएवढेच पैसे आहेत,याची त्याच्या आई-वडिलांना कल्पना नव्हती. दरम्यान,त्याच्या या ट्रिपबद्दल फेसबुकवरून अनेकांना कळलं. मग त्याला कुणीपाण्याची बाटली दिली,तर कुणी त्याच्या सायकलवर बोर्ड लावून दिला. आणि तोनिघाला. केरळमध्ये अन्य सायकलपटूंनी त्याला रस्त्याची माहिती दिली. भाषाहीदेखील अडचण होती. कारण'आय अॅम फ्रॉम केरला,गोइंग टू काश्मीर'एवढंच एकइंग्रजी वाक्य त्याला येत होतं. एक जानेवारीला निघून कर्नाटकगोवा,महाराष्ट्रगुजरातराजस्थानदिल्लीपंजाबहरियाणाचंडीगडहिमाचल प्रदेश या राज्यांतून प्रवास करत तो तीन एप्रिलला काश्मीरलापोहोचला. वाटेतले खर्च भागवण्यासाठी त्याने 10 रुपयांना एक कप या दराने अनेक ठिकाणी चहा तयार करून विकला. पेट्रोल पंपांवर किंवा कोणी हितचिंतकांनीकेलेल्या सोयीच्या ठिकाणी तो रात्री झोपायचा.'केरला टू काश्मीर' (Kerala To Kashmir)या त्याच्या सायकलवर लिहिलेल्या बोर्डाने अनेक जण त्याच्याकडेआकर्षित झाले. माध्यमांनी त्याच्या मुलाखती घेतल्या. 'हे कठीण होतं,तरीही मध्येच सोडून द्यायचा विचार मी कधीच केला नाही. मी कधी तरीकाश्मीरला पोहोचेनच,यावर माझा विश्वास होता. टायर पंक्चर होणं,फूडपॉयझनिंग वगैरे एखाद-दोन अपवाद सोडले,तर या प्रवासाने मला सगळ्या चांगल्याआठवणीच दिल्या,'असं निधिन सांगतो. मनालीमध्ये एका मल्याळी कुटुंबाने एकही रुपया न घेता त्याची राहायची व्यवस्था केली. दिल्लीत एकागॅसचा स्टोव्ह विकत घेऊन दिला. काहींनी कपडे दिले. मिळालेल्या पैशांतूनत्याने स्वतःसाठी ऊबदार कपडेही घेतले. श्रीनगरच्या (Srinagar)लालचौकात तो आपली सहल थांबवणार होता. त्याच्या काही किलोमीटर्स आधी त्यालानायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचा ताफा दिसला. त्यांनी उतरून त्याला मिठीमारली. ते कोण होते ते त्याला त्या वेळी माहितीच नव्हतं. त्या वेळी आपल्याडोळ्यांत अश्रू आल्याचं त्याने सांगितलं. दिल्लीत लॉकडाउनझाल्यामुळे पुन्हा सायकलनेच येण्याचा त्याचा बेत रद्द करावा लागला.दिल्लीतल्या एका व्यक्तीने केरळमध्ये येणाऱ्या लॉरीत त्याला बसवून दिलं. एकजानेवारी2021रोजी केरळमधून निघालेला निधिन काश्मीरला जाऊन30एप्रिलरोजी पुन्हा केरळला परतला.'हा प्रवास म्हणजे माझ्या आयुष्यातल्या काळ्यादिवसांवर मात करण्यासारखं होतं,'असं तो म्हणतो. वर्ल्ड टूर,माउंटएव्हरेस्टवर चढाई करणं आणि सिनेमा ही आपली स्वप्नं असल्याचं तो सांगतो.त्याच्या प्रेरक प्रवासाची गोष्ट व्हायरल झाल्यावर अनेक मल्याळीदिग्दर्शकांनी त्याच्याशी संपर्क साधला आहे,हा त्या दृष्टीने मिळालेला एकसंकेत असू शकतो,असं तो मानतो.
  First published: