ऑकलंडच्या रग्बी संघाचा ट्रेनर ठेवणार विराटसेनेला फिट!

वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघासाठी नव्या प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 1, 2019 06:44 PM IST

ऑकलंडच्या रग्बी संघाचा ट्रेनर ठेवणार विराटसेनेला फिट!

मुंबई, 01 सप्टेंबर : वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघासाठी नव्या प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी टीम इंडियाच्या नव्या ट्रेनरचेही नाव जाहीर केले. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघाच्या पूर्व प्रशिक्षकांचे करार रद्द होणार आहे. त्यामुळं दक्षिण आफ्रिकेपासून नवे प्रशिक्षक भारतीय संघासाठी असतील. दरम्यान मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान भारताचा ट्रेनर म्हणून न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाचा आणि ऑकलॅंडच्या रग्बी संघाचा माजी ट्रेनर निक वेब भारतीय संघाच्या अनुकूलनचे (strength and conditioning) प्रशिक्षक झाले आहेत. या पदासाठी तीन उमेदवारांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली होती. यात ल्यूत वुडहाऊस आणि भारताचे एस रजनीकांत यांचे नाव आघाडीवर होते.

दरम्यान, भारताचे रजनीकांत ही भारतीय संघातील काही प्रमुख खेळाडूंची पहिली पसंत होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नियुक्तीमध्ये अचानकपणे निक वेब यांचे नाव आघाडीवर आले. खरतर बंगळूरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सध्या ट्रेनर असल्यामुळं रजनीकांत यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही.

वाचा-91 कसोटी सामने, 125 डावांनंतर राखली इशांत शर्मानं लाज!

सुत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, “या नियुक्तीची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. बीसीसीआयचे अधिकारी याबाबत औपचारिकता पूर्ण करतील. त्यामुळं वेब यांना जबाबदारी मिळेल की नाही याबाबत साशंकता कायम आहे. मात्र, सध्या ट्रेनर म्हणून पहिली पसंती त्यांना आहे. शेवटी अंतिम निर्णय बीसीसीआयचे मुख्य अधिकारी घेतील” असे सांगितले.

Loading...

वाचा-शतक केल्यानंतर भावुक झाला हनुमा विहारी, कारण होतं 12 वर्षांपूर्वीच दु:ख!

दरम्यान, 32 वर्षांच्या वेब यांनी न्यूझीलंडच्या प्रथम श्रेणी संघासोबत काम केले आहे. तसेच याआधी त्यांनी न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघालाही ट्रेनिंग दिले आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वेब रग्बी खेळाशी निगडीत असल्यामुळं त्यांना पहिली पसंती देण्यात आली आहे. सध्या भारतीय संघाचे ट्रेनर असलेल शंकर बासु हे वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर रजा घेतील.

वाचा-बुमराहच्या हॅट्ट्रिकचा खरा हिरो ठरला विराट! एका निर्णयानं घडला इतिहास

आघाडीच्या नेत्यांना आंबेडकरांसोबत आघाडीची आशा धूसर; आतापर्यंतच्या टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: team india
First Published: Sep 1, 2019 06:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...