मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /धोनीच्या वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर एकटा वॉर्नर पडला भारी! लिलावात मिळाली Shocking रक्कम

धोनीच्या वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर एकटा वॉर्नर पडला भारी! लिलावात मिळाली Shocking रक्कम

धोनीच्या (MS Dhoni) वर्ल्ड चॅम्पियन टीमवर एकटा डेव्हिड वॉर्नर भारी पडला आहे. लिलावामध्ये 2011 वनडे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियापेक्षा (Team India) डेव्हिड वॉर्नरला (David Warner) जास्त पैसे मिळाले आहेत.

मुंबई, 25 डिसेंबर : भारताने 2011 सालचा वनडे वर्ल्ड कप (2o11 ODI World Cup) जिंकला होता. या विजेत्या टीमची हस्ताक्षर असलेली बॅट दुबईच्या लिलावात 25 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 19 लाख रुपयांमध्ये विक्री झाली. तर डेव्हिड वॉर्नरची (David Warner) 2016 ची आयपीएल (IPL) विजेता सनरायजर्स हैदराबाद (SRH) जर्सीला 30 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 23 लाख रुपये मिळाले, म्हणजेच लिलावात एकटा वॉर्नर टीम इंडियाच्या पुढे राहिला. क्रिकफ्लिक्सद्वारा आयोजित करण्यात आलेल्या या लिलावात वॉर्नरच्या जर्सीवर सर्वाधिक बोली लागली, तर धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वातल्या टीमचं हस्ताक्षर असलेल्या बॅटच्या डिजीटल अधिकारासाठीही अनेकांनी रस दाखवला. धोनीच्या नेतृत्वात भारताने 2011 साली 28 वर्षांनंतर वनडे वर्ल्ड कप जिंकला होता.

दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) 200 व्या टेस्ट मॅचच्या संग्रहाचे डिजीटल अधिकार मुंबईच्या अमल खान यांना 40 हजार अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास 30 लाख रुपयांना मिळाले. या संग्रहात हस्ताक्षर असलेली जर्सी, विशेष स्मारक कव्हर आणि हस्ताक्षर असलेल्या मॅच तिकीटाचा समावेश होता. भारताने 1983 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर लता मंगेशकर यांनी एका संगीत कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, या कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगला 21 हजार डॉलर म्हणजेच 15,75,740 रुपये मिळाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्टूनना आणि 1952 साली भारताच्या पहिल्या पाकिस्तान दौऱ्याच्या ऑटोग्राफला 15 हजार डॉलर म्हणजेच 11,25,528 रुपये मिळाले.

भारताचे पहिले कर्णधार सीके नायुडू यांचा संग्रह, ज्यात त्यांच्या बँकेचं पासबूक आणि पासपोर्ट यांचा समावेश होता, याला 7,500 डॉलर (5,62,725 रुपये) आणि 980 डॉलर 73,529 रुपये) मिळाले. भारताची फास्ट बॉलर झूलन गोस्वामीने वर्ल्ड कप 2017 सेमी फायनलमध्ये घातलेल्या जर्सीला 10 हजार डॉलर (7,50,300 रुपये) मिळाले.

या लिलावातून जवळपास 2.5 कोटी रुपये मिळाले, असं क्रिकफ्लिक्सचे को-फाऊंडर अनवर हुसैन यांनी सांगितलं.

First published:
top videos

    Tags: David warner, Team india