न्यूझीलंड, 30 मार्च : न्यूझीलंडने (New Zealand) बांगलादेशला (Bangaladesh) दुसऱ्या टी-20 (T20 series) सामन्यात 28 धावांनी पराभूत करुन मालिका 2-0 ने आपल्या खिशात घातली आहे. दुसऱ्या टी 20 सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडला 18 षटकं खेळण्याची संधी मिळाली. 18 षटक संपलं आणि पावसाने हजेरी लावली. तेव्हा न्यूझीलंडने 5 गडी गमवून 173 धावा केल्या होत्या. पावसाचं चिन्हं पाहता बांगलादेशला खेळण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. डकवर्थ लुईस नियमानुसार, धावांची बेरीज वजाबाकी करण्यात येत होती. मात्र टार्गेट धावसंख्या देण्याआधीच बांगलादेशचा संघ मैदानात उतरला होता आणि खेळण्यास सुरुवात केली होती. पंच मैदानात नव्या टार्गेटची वाट बघत होते. एक षटक खेळूनही झालं. तरी टार्गेट धावसंख्या काही येईना हे पाहता पंचांनी 1 षटक आणि 3 चेंडु खेळून झाल्यावर सामना रोखला.
A 28 run DLS win in Napier means the team have won 7/7 series this summer! One game remaining this season for the team and it's on Thursday in Auckland. #NZvBAN pic.twitter.com/njkj5tRMtF
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 30, 2021
डकवर्थ नियमानुसार धावसंख्येची गोळाबेरीज सुरू असल्याने बांगलादेशचे प्रशिक्षक रसेल डॉमिंगो यांनी राग व्यक्त केला. त्यानंतर बांगलादेशसमोर 16 षटकात 170 धावांचं आव्हान ठेवण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आणि सामन्याला सुरुवात झाली. मात्र बांगलादेश संघ 16 षटकात 7 गडी गमवून 142 इतकीच धावसंख्या करू शकला.
(वाचा - IPL 2021: अर्जुन तेंडुलकरचं मुंबई इंडियन्ससोबत training, मैदानात गाळला घाम)
बांगलादेशकडून सौम्या सरकारने सर्वाधिक 51 धावा केल्या, तर मोहम्मद नईमने 38 धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून टीम सॉउथी, हाशिम बेनेट, अॅडम मिलन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
तिसऱ्या टी-20 सामन्याची फक्त औपचारिकता बाकी असून हा सामना इडेन पार्कवर खेळला जाणार आहे. ही मालिका 3-0 ने जिंकण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bangladesh cricket team