दुसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडचा भारतावर 40 धावांनी विजय

आज राजकोटमध्ये सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने पहिले फलंदाजी करत 20 षटकात 196 धावांचा डोंगर उभा केला. यात मुनरोची 109 धावांची खेळी महत्त्वपूर्ण ठरली.याला उत्तर देताना भारत 20 षटकात 7 बाद 156 इतकाच पल्ला गाठू शकला

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 4, 2017 10:59 PM IST

दुसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडचा भारतावर 40 धावांनी विजय

राजकोट04 नोव्हेंबर: भारत न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या तीसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडने भारतावर तब्बल 40 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे आता भारत न्यूझीलंडच्या मालिकेत 1-1ने बरोबरी केली.

आज राजकोटमध्ये सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  न्यूझीलंडने पहिले फलंदाजी करत 20 षटकात 196 धावांचा डोंगर उभा केला. यात मुनरोची 109 धावांची खेळी महत्त्वपूर्ण ठरली.याला उत्तर देताना भारत 20 षटकात 7 बाद 156 इतकाच पल्ला गाठू शकला. विराट कोहलीची 65 धावांची खेळीही विजयापर्यंत पोचवू शकली नाही. न्यूझीलंडकडून बाऊल्टने 4 गडी बाद केले. तर आजच्या सामन्यात धोनीचे अर्धशतक एक धावेने हुकलx.

या सामन्यानंतर आता 1-1 अशी बरोबरी झाल्यामुळए पुढचा सामना हा निर्णायक सामना असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2017 10:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...